मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीला आज हिंगोलीतून सुरुवात झाली. आपल्या भाषणात त्यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. जातींमध्ये तेढ वाढवून छगन भुजबळ यांचा दंगल घडवण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप जरांगें यांनी केला आहे. पण हा डाव कधीच यशस्वी होऊ देणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला १३ जुलैपर्यंत वेळ दिला आहे. त्यानंतरचा निर्णय राज्य सरकारला झेपणार नाही, असा इशाराही दिला आहे.
आज मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाडा दौरा सुरू केला आहे. आज त्यांनी हिंगोली जिल्ह्यात बोलताना राज्य सरकारला इशारा दिला. मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. येत्या १३ तारखेपर्यंत मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या नाहीतर त्यानंतरचा निर्णय सरकारला झेपणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगे म्हणाले आम्ही सरकारवर विश्वास टाकला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही आमचा विश्वास आहे. आमच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. अन्यथा मराठा समाज उसळून उठेल.मराठा समाजावर ज्या ज्या वेळी संकट येतील त्यावेळीहिंगोली जिल्हा पूर्ण ताकदीने पुढे आला आहे. त्यामुळे याहिंगोली जिल्ह्यातून राज्य सरकारला सांगणं आहे की,मराठा समाजाचा हा आक्रोश आहे.
मराठा समाज आपल्या लेकरांसाठी रस्त्यावरउतरला आहे. एकट्या छगन भुजबळांचं ऐकून जरमराठा समाजावर अन्याय केलात तरयाद राखा, असा इशाराही मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. आरक्षण छगन भुजबळांची मक्तेदारी नाही. मात्र त्यांचं ऐकून जर आमच्यावर अन्याय झाला तर २८८ पैकी सत्ताधारी गटाचा एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही. राज्य सरकारने हा आक्रोश समजून घ्यावा.
जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेत किमान २०० ठिकाणी तरी सत्ताधाऱ्यांचा सुपडा साफ करू. सरकारने आमच्या विरोधात अभ्यासक उतरवले आहेत. सरकारने १६ टक्के आरक्षण दिलेन्यायालयातटिकलं नाही. १३ टक्के दिलं ते पण टिकू दिलं नाही, आता १० टक्के आरक्षण दिलं, पण लागू होण्याआधीच याचिका दाखल केली आहे, मराठ्यांचे आरक्षण टिकू न देण्याचा हा कुटील डाव असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला आहे.
संबंधित बातम्या