मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  जीआरमध्ये तुम्ही ‘ते’ तीन शब्द बदलून आणले तर आम्ही हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करू : जरांगे पाटील

जीआरमध्ये तुम्ही ‘ते’ तीन शब्द बदलून आणले तर आम्ही हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करू : जरांगे पाटील

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 07, 2023 06:04 PM IST

Maratha Reservation Protest Jalna : सरकारचा जीआर घेऊन मंत्री अर्जून खोतकरमनोज जरांगे यांना भेटले आहेत तर जरांगेयांच्या वतीने आंदोलकांचे शिष्टमंडळ मुंबईला जाणार असून ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. मात्र मनोज जरांगे आंदोलन सुरूच ठेवणार आहेत.

Manoj jarange patil
Manoj jarange patil

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी गेल्या १० दिवसांपासून उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे, मात्र त्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या वतीने एक शिष्टमंडळ मुंबईला जावून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. राज्य सरकारच्या वतीनं अर्जुन खोतकर यांनी आज मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना शासनाचा जीआर दाखवला आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र जरांगे यांनी यात काही बदल सुचवले आहेत. जीआरमध्ये सुधारणा झाल्यावरच आपण उपोषण सोडणार, असं त्यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला सांगितलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सरकारच्या शिष्टमंडळासमोर मनोज जरांगे पाटील म्हणाले की. हा कालचाच जीआर आहे. यात सुधारणा करणे आवश्यक आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र हवं. तसेच जीआरमध्ये सुधारणा करण्यासाठी शिष्टमंडळ मुंबईला जाणार आहे.

अर्जुन खोतकर म्हणाले की, आरक्षणावर चर्चेसाठी जरांगे यांनी मुंबईला यावे, हवं तर हॅलिकॉप्टरचीही व्यवस्था करू. यावर जरांगे म्हणाले की, तुम्ही ते तीन शब्द बदलून आणले तर आम्ही तुमच्यावर हॅलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करू.

राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटलं आहे की, मराठा समाजातील ज्या व्यक्तींनी मराठा-कुणबी,कुणबी-मराठा जातीच्या जात प्रमाणपत्राची मागणी केली असेल अशा व्यक्तींनी सादर केलेल्या निजामकालीन महसूली अभिलेखात,शैक्षणिक अभिलेखात तसेच अन्य अनुषंगिक समर्थनीय अभिलेखात जर त्यांच्या वंशावळीचा उल्लेख "कुणबी" असा असेल. तर अशा व्यक्तींनी सादर केलेल्या पुराव्यांची काटेकोर तपासणी करुन त्यांना मराठा-कुणबी,कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे

WhatsApp channel