आमच्या आयाबहिणींवर हल्ला झाला तेव्हा तू कुठं होतास रे टिकल्या! जरांगे पाटील यांनी कालीचरण महाराजांना झोडपून काढलं!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आमच्या आयाबहिणींवर हल्ला झाला तेव्हा तू कुठं होतास रे टिकल्या! जरांगे पाटील यांनी कालीचरण महाराजांना झोडपून काढलं!

आमच्या आयाबहिणींवर हल्ला झाला तेव्हा तू कुठं होतास रे टिकल्या! जरांगे पाटील यांनी कालीचरण महाराजांना झोडपून काढलं!

Nov 19, 2024 06:54 PM IST

Manoj Jarange Patil on Kalicharan : मराठा आरक्षण आंदोलनावर टीका करणाऱ्या कालीचरण महाराजांवर मनोज जरांगे पाटील यांनी सडकून टीका केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी कालीचरण महाराजांना झोडपून काढलं!
मनोज जरांगे पाटील यांनी कालीचरण महाराजांना झोडपून काढलं!

Manoj Jarange slams Kalicharan Maharaj : मराठा आरक्षणाच्या आंदोलनानं हिंदू समाजात फूट पाडल्याचा वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजांना आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अक्षरश: झोडपून काढलं आहे. ‘आंतरवाली सराटीत आमच्या आयाबहिणींवर लाठीहल्ला झाला तेव्हा हा कुठं होता? त्या आयाबहिणी हिंदू नव्हत्या का?,’ असा रोकडा सवाल जरांगे यांनी केला आहे.

कालीचरण बाबांनी अलीकडंच एका कार्यक्रमात मनोज जरांगे यांची तुलना राक्षसाशी केली होती. हा माणूस हिंदू समाजात फूट पाडतो आहे, असं कालीचरण म्हणाले होते. यावर जरांगे पाटील यांनी तिखट प्रतिक्रिया दिली.

'ह्या बाबाला या विषयावर बोलण्याची काही गरजच नव्हती. आम्ही संत-महंतांना मानणारे लोक आहोत. पण आरक्षणाचा बाबाशी संबंध काय? ह्या लोकांनी आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार दिले पाहिजेत. एकजूट राहण्यासाठी आवाहन केलं पाहिजे. महाराजांचं हे काम असतं. आरक्षणावर बोलणं हे त्यांचं काम नाही. पण हा कोण बाबा आला? विचित्र प्राणी आहे. ह्याला काय घेणं होतं. मी कधी ह्याला काही बोललो होतो का? हा कुठनं टिकल्या लावतो. पुढनं लावतो का मागणं लावतो. आम्ही कधी काही बोललो होतो का? ह्याला मी ओळखतही नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.

‘हिंदुत्वाच्या गोष्टी ह्यानं आम्हाला शिकवायची गरज नाही. आंतरवाली सराटीत आमच्या आयाबहिणींवर हल्ला झाला तेव्हा हा टिकल्या कुठं होता. त्या आयाबहिणी हिंदू नव्हत्या का? आमच्या पोरांनी फाशी घेतली तेव्हा हा कुठे होता. ते हिंदू नव्हते का? बेअकल्यासारखा बोलतो. टिकल्या लावतो. नथ घालतो. हा वर वेगळा दिसतो, खाली वेगळा दिसतो. मराठे हिंदू नाहीत का? हिंदूमध्ये अर्धा मराठा आहे. धर्मावर संकट येतं तेव्हा आमच्यासारखे गरीब हिंदूच रक्षण करतात. मराठे, ओबीसी आणि अठरापगड जातीच वार झेलतात. तुमच्यासारखे कुलुप लावून एसीत बसतात,' असा घणाघात जरांगे यांनी केला.

पाकिटं घेऊन कीर्तनं करणारे तुम्ही…

‘आमची गरिबाची लढाई आम्ही लढतो आहोत. त्या बाबाला आमचं दु:ख कळायचं नाही. आमची लोक रात्रंदिवस कष्ट करतात. त्यांचं दु:ख तुला कळायचं नाही. खरा वारकरी संप्रदाय आणि खरं हिंदुत्व चालवणारे खूप लोक आहेत देशात. त्यांच्यासमोर आम्ही नतमस्तक होतो. ह्याला काय माहीत आहे हिंदुत्व. रोज झोपेतून उठल्यानंतर रामराम करतो आम्ही. तुला काय कळणार? तुला इतका हिंदुत्वाचा कळवळा आहे तर आमच्या लोकांचं दु:ख समजून घ्यायला तू आला का? का नाही म्हटलास की या हिंदूंनाही आरक्षण द्या, असा सवाल जरांगे पाटील यांनी केला.

‘तुला सुपारी घ्यायची तर घे, पण आमच्या नादाला लागण्याची गरज नाही. तुझ्यासारखे टुकार लोक मराठ्याची पोरं खिशात घेऊन फिरतात. तुला मराठा परवडणार नाही,’ असा इशाराही जरांगे पाटील यांनी कालीचरण महाराजांना दिला.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर