Maratha Reservation : पुणेकरांसाठी महत्त्वाचं! मराठा आरक्षण पदयात्रेमुळं पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीत मोठे बदल-manoj jarange patil pad yatra will enter in pune today big traffic changes in pune and pimpri chinchwad see details ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maratha Reservation : पुणेकरांसाठी महत्त्वाचं! मराठा आरक्षण पदयात्रेमुळं पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीत मोठे बदल

Maratha Reservation : पुणेकरांसाठी महत्त्वाचं! मराठा आरक्षण पदयात्रेमुळं पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीत मोठे बदल

Jan 24, 2024 09:14 AM IST

Pune traffic changes in Pune for Maratha protest : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे पदयात्रा नेणार आहेत. हा मोर्चा पुण्यात दाखल झाला आहे. मोठ्या प्रमाणात आंदोलक येणार असल्याने पुण्याच्या आणि पिंपरीच्या वाहतुकीत आज देखील मोठे बदल करण्यात आले आहेत.

Pune traffic changes in Pune for maratha protest :
Pune traffic changes in Pune for maratha protest : (HT_PRINT)

Pune traffic changes in Pune for maratha proteste : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा ही मुंबईला निघाली आहे. ही पदयात्रा मंगळवारी पुण्यात पोहचली असून मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो मराठा आंदोलकांचे पुण्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. कारेगाव भीमा येथे पायी रॅली येताच मोठा जल्लोष करण्यात आला. आज मनोज जरांगे पाटील हे पुणे आणि पिंपरीचिंचवड मार्गे लोणावळा येथे जाणार आहे. त्यामुळे पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आज देखील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे. त्यामुळे आज पुण्यात मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यत असून जर आज घराबाहेर पडणार असाल तर वाहतुकीचे नियोजन पाहून बाहेर पाडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षण मोर्चा काल रांजणगाव येथुन मुक्काम आटोपून कोरेगाव भिमा येथे पोहचला. यानंतर हा मोर्चा पुन्हा मार्गस्त होऊन खराडी येथील चोखीदाणी मुक्कामी थांबला. आज बुधवारी खराडी येथुन निघुन पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीतून लोणावळा येथे मुक्कामी थावणार आहे. जरांगे पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव वाहनांसह या मोर्चात सहभागी झाले आहे. त्यामुळे मोर्चा मार्गावर व आजुबाजुच्या परिसरात वाहतूक कोंडी असल्याने वाहतूक बदल करण्यात आले आहे.

पुण्यातील वाहतूक बदल

अहमदनगरकडुन पुणे शहराकडे येणारी वाहतूक खालील नमुद केलेल्या ठिकाणांवरून गरजेप्रमाणे ठराविकवेळी वळविण्यात येईल.

शिक्रापुर येथुन वाकण भोसरी पुणे शहर, लोणीकंद येथुन थेऊर फाटा केसनंद थेऊर ते सोलापूर रोड, वाघोली परिसर वाघोली आव्हाळवाडी मांजरी केशवनगर मुंढवा इच्छितस्थळी जावे. अहमदनगर कडुन पुणे शहराकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक वाघेश्वर मंदिरापासून गरजेप्रमाणे बंद राहील व आयश्यकतेप्रमाणे सुरू करण्यात येईल.

Mumbai Pune express way: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज पुन्हा २ तासांचा मेगाब्लॉक; 'या' वेळेत वाहतूक बंद

पुणे शहरामधुन अहमदनगर कडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक खालील नमुद केलेल्या ठिकाणांवरून गरजेप्रमाणे ठराविकवेळी वळविण्यात येईल. खराडी बायपास चौकामधुन उजवीकडे वळण घेवून मगरपट्टा रोडने सोलापूर रोड डावीकडे वळण घेवून थेऊर फाटा डावीकडे वळण घेवून थेऊर केसनंद ते लोणीकंद अहमदनगर रोड कडे जावे.

होळकर पुल व सादलबाबा चौक येथुन येणारी वाहतूक चंद्रमा चौक विश्रांतवाडी धानोरी लोहगाव मार्गे वाघोली अहमदनगर रोड १) खराडी जकातनाका चौक / खराडी दर्गा चौक / खराडी बायपास चौक / चंदननगर या चौकामधुन अहमदनगरकडे जाणारी वाहने मुंढवा चौक येथुन वळवण्यात आली आहे. प्रवाशांनी मांजरी आव्हाळवाडी वाघोली - अहमदनगर रोड, किंवा मगरपट्टा रोड सोलापूर रोड थेऊरफाटा येथुन थेऊर केसनंद लोणीकंद अहमदनगर रोड या मार्गाचा वापर करावा.

Uddhav Thackeray : भाजप भेकड व भाकड पक्ष.. तेथे भ्रष्टाचार्यांना मान, पण शंकराचार्यांना नाही; ठाकरेंचा वार

विमानगनर चौक / रामवाडी चौक / शास्त्रीनगर चौक / गुंजन चौक / तारकेश्वर या चौकामधुन अहमदनगरकडे जाणारी वाहने गरजेप्रमाणे ठराविक वेळी चंद्रमा चौक, विश्रांतवाडी, धानोरी, लोहगाव, वाघोली मार्गे अहमदनगर रोड अशी जातील.

तारकेश्वर चौक, पर्णकुटी चौक, गोल्फ चौक, बदामी चौक येथुन शास्त्रीनगर चौकाकडे जाणारी वाहने गरजेप्रमाणे वळविण्यात येईल, मोर्चामधील वाहने पर्णकुटी चौकामधुन तारकेश्वर चौकाकडे गरजेनुसार चळविण्यात येतील. कोरेगाव पार्क जंक्शन येथुन आंबेडकर सेतू कडे गरजेप्रमाणे बंद केली जाईल. नॉर्थ मेन रोड चौक, ए.बी.सी. चौक, ताडीगुत्ता चौक येथुन इच्छितस्थळी जाण्यास पर्याय उपलब्ध राहील, ३. श्रीमान चौक ते आंबेडकर सेतूकडे जाणारी वाहतूक गरजेप्रमाणे कोरेगाव पार्क जंक्शनकडे वळवली जाईल

मोबोज चौकामधुन आंबेडकर सेतूकडे जाणारी वाहतूक गरजेप्रमाणे कोरेगाव पार्क जंक्शनकडे वळवली जाईल.

आय.बी. जंक्शन ते मंगलदास चौकाकडे जाणारी वाहतूक गरजेप्रमाणे सर्किट हाऊस चौकाकडे वळवली जाईल

ब्लू डायमंड चौक येथुन मंगलदास रोड गरजेप्रमाणे वळविण्यात येईल.

अलंकार चौक, जहांगीर चौक येथील वाहतूक गरजेप्रमाणे ठराविक वेळी वळवली जाईल.

शाहीर अमर शेख चौक, आर.टी.ओ. चौक येथील वाहतूक गरजेप्रमाणे ठराविक वेळी वळवली जाईल.

पोल्ट्री फार्म चौक शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक गरजेप्रमाणे होळकर पुलाकडे वळविण्यात येईल.

आठ मुळा सर्कल, पाटील इस्टेट चौक, आर.टी.ओ. चौक येथील वाहतुक गरजेप्रमाणे ठराविक वेळी चळविण्यात येईल.

स.गो. बर्वे अंडरपास, सिमला ऑफिस चौक, चाफेकर चौक, याकडेवाडी, नर्गीस दत्त रोड, सूर्यमुखी दत्त मंदिर चौक, संगान्ना धोत्रे पथ, सेनापती बापट रोड येथील वाहतूक गरजेप्रमाणे ठराविक वेळी वळविण्यात येईल,

सकाळी ०८:०० वा. पुढे आवश्यकतेप्रमाणे औध व बाणेर रोड वरून पुणे विद्यापीठ शिवाजीनगरकडे येणारी संपूर्ण वाहतूक गरजेप्रमाणे ठराविक वेळी वळविण्यात येईल.

औध रोड कडुन येणारी वाहतूक चौक बेमन चौकामधुन आवश्यकते प्रमाणे वळवण्यात येवून अआंबेडकर चौक, बोपोडी येथुन हॅरिस ब्रीज मार्गे किंवा साई धौक खड़की पोलीस ठाणे अंडरपास मार्गे जुना मुंबई पुणे हायवेवर येईल.

बाणेर कडुन विद्यापीठ मार्गे शिवाजीनगर येणारी सर्व वाहने गरजेप्रमाणे वळविण्यात येईल.

महाबळेश्वर हॉटेल येथुन बाणेर पाषाण लिंक रोड मार्गे सुस रोड येथे येवून शिवाजी चौक पाषाण मार्ग किंवा सुसखिड मार्गे चांदणी चौक कोथरूड ते पुणे शहर अशी गरजेप्रमाणे वळविण्यात येईल. २. बाणेर परिसरामधील वाहन चालक अभिमान श्री जंक्शन बाणेर रोड ते अभिमानश्री जंक्शन पाषाण

रोडवरून उजवीकडे वळण घेवून शिवाजी चौक पाषाण चांदणी चौक कोथरूड मार्गे पुणे शहरकडे गरजेप्रमाणे वळविण्यात येईल.

पाषाण रोड परिसरातील वाहतूक गरजेप्रमाणो ठराविक वेळी वरील मार्गाने वळविण्यात येईल,

पुणे विद्यापीठ कडुन औंध मार्गे राजीव गांधी पुलमार्गे तसेच जुना पुलमार्गे सांगवीकडे जाणारी वाहने ठराविक वेळी आवश्यकतेनुसार वाहतूक ही पाषाण व बाणेर रोडकडे वळवण्यात येतील. विद्यापीठ चौकामधून वाहतूक सोडल्यानंतर गरजेप्रमाणे वळविण्यात येईल. ब्रेमेन चौक येथुन सर्व वाहने आंबेडकर चौक हॅरीस ब्रीज मार्गे पिंपरी चिंचवडकडे सोडण्यात येतील.

पिंपरी-चिंचवड येथील वाहतुकीत करण्यात आलेले बदल

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईपर्यंत पदयात्रा काढली आहे. ही पदयात्रा आज पिपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून जाणार आहे. त्यासाठी वाहतुकीत बदल केले आहेत.

पदयात्रा ही राजीव गांधी पूल (सांगवी), जगताप डेअरी चौक, डांगे चौक, बिर्ला रुग्णालय, चापेकर चौक (चिंचवडगाव), अहिंसा चौक महावीर चौक (चिंचवड स्टेशन), खंडोबामाळ चौक (आकुर्डी), टिळक चौक (निगडी), भक्तीशक्ती चौक, देहूरोड, तळेगावमार्गे मुंबईकडे जाणार आहे. त्या अनुषंगाने बुधवारी सकाळी सहा वाजतापासून वाहतुकीत बदल केला आहे.

सांगवी वाहतूक विभाग

औंध डी मार्टकडून सर्व प्रकारच्या वाहनांना सांगवी फाट्याकडे प्रवेश बंदी असून या मार्गावरील वाहने पोल चौकातून डावीकडे नागराज रस्तामार्ग जातील.

पिंपळे निलखकडून येणारी वाहने रक्षक चौकाकडे न येता विशालनगर डीपी रस्त्याने जगताप चौक, कस्पटे चौकमार्गे जातील. जगताप डेअरी पुलाखालील चौकामध्ये कस्पटे चौकाकडून येणारी वाहने डाव्या व उजव्या बाजुने औंध -

रावेत रस्त्याला न येता ती सरळ ग्रेड सेपरेटरमधून शिवार चौक कोकणे चौकाकडून जातील.

शिवार चौकाकडून येणारी वाहतूक उजव्या डाव्या बाजुने औंध-रावेत रस्त्याला न येता ग्रेड सेपरेटरमधून कस्पटे चौकातून जातील. तापकीर चौक, एमएम चौकाकडून काळेवाडी फाटा पुलाकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असून या मार्गावरील वाहने रहाटणी फाटा चौकातून रहाटणीगाव गोडांबे चौकाकडून जातील.

सांगवीगावातून सांगवी फाट्याकडे येणारी वाहने शितोळे पंप, जुनी सांगवी व वसंतदादा पुतळा चौक जुनी सांगवी दापोडीमार्गे जातील.

वाकड वाहतूक विभाग

ताथवडेगाव चौकाकडून डांगे चौकाकडे येणारी वाहने ताथवडे चौकातून उजवीकडे वळून ताथवडे अंडरपास किंवा परत संत तुकाराम महाराज पूलमार्गे जातील. काळाखडक येथून डांगे चौकाकडे जाणारी वाहने काळाखडक येथून यु टर्न घेऊन भुमकर चौकमार्ग जातील. वाकड दत्तमंदिर रस्त्याने डांगे चौकाकडे येणारी वाहने अण्णा भाऊ साठे चौकातून उजवीकडे किंवा डावीकडे वळून जातील.

छत्रपती चौक, कस्पटे वस्ती येथून काळेवाडी फाट्याकडे येणारी वाहने छत्रपती चौक येथून डावीकडे वळून जातील.

बारणे कॉर्नर थेरगाव येथून थेरगाव फाट्याकडे येणारी वाहने उजवीकडे वळून जातील किंवा यु टर्न घेऊन तापकीर चौकाकडे जातील.

थेरगावकडून बिर्ला रुग्णालय चौकाकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असून ही वाहने राघवेंद्र महाराज मठ येथून जातील किंवा बारणे कॉर्नर थेरगावमार्गे जातील.

कावेरीनगर पोलिस वसाहतीकडून येणाऱ्या वाहनांना कावेरीनगर अंडरपासकडे जाण्यास बंदी असून ही

वाहने वाकड भाजीमंडई समोरील कॉर्नर येथून डावीकडे वाकड पोलिस ठाण्याकडील रस्त्याने दत्त मंदिर रस्त्याने जातील.

चिंचवड वाहतूक विभाग

दळवीनगर चौकाकडून खंडोबामाळ व चिंचवड स्टेशनकडे जाणारा रस्ता वाहनांसाठी बंद असून या मार्गावरील वाहने बिजलीनगर चौक मार्गाने जातील.

रिव्हर व्ह्यूव चौकातून डांगे चौक तसेच डोंगे चौकाकडून महावीर चौकाकडे येणाऱ्या वाहनांस बंदी असून या मार्गावरील वाहने चिंचवडे फार्म मार्गाने वाल्हेकरवाडी रावेतमार्गे जातील, तसेच भोसरीकडे जाणारी वाहने बिजलीनगर वाल्हेकरवाडीमार्गे जातील.

चिंचवडेनगर टी जंक्शनकडे रिव्हर व्ह्यूवकडून जाणारी वाहने सरळ रावेतमार्गे जातील.

लोकमान्य हॉस्पिटल चौक, चिंचवड समोरील रस्त्यावरून महावीर चौक चिंचवडकडे जाणरा रस्ता वाहनांसाठी बंद असून या मार्गावरील वाहने लोकमान्य हॉस्पिटल चौकापासून डावीकडे वळून दळवीनगरमार्गे जातील.

एसकेएफ चौक, चिंचवड मार्गाने खंडोबा माळ चौकाकडे जाण्यास वाहनांना बंदी असून या मार्गावरील वाहने बिजलीनगर चौक मार्गाने जातील.

लिंकरोड, पिंपरीकडून येणारी वाहने चापेकर चौकात न येता मोरया हॉस्पिटल चौक, केशवनगरमार्गे जातील.

महावीर चौक व शिवाजी चौकात येणारया वाहनांना प्रवेश बंदी असून या मार्गावरील वाहने मोहनगर चौकमार्गे जातील.

बिजलीनगर चौकाकडून त्रिवेणी हॉस्पिटल चौकाकडून रिव्हर व्ह्यूव चौकाकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असून या मार्गावरील वाहतूक रावेतमार्ग जाईल.

मुकाई चौकाकडून चिंचवडकडे येणारी वाहतूक त्रिवेणी हॉस्पिटल वाल्हेकरवाडी येथे डावीकडे वळून पुढे पार्श्वनाथ चौक, भेळ चौकमार्गे काचघर चौकातून डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन भक्तीशक्ती चौकातील भुयारी मार्गातून अंकुश चौक, त्रिवेणीनगरमार्गे जातील.

पिंपरी वाहतूक विभाग

निरामय हॉस्पिटलकडून महावीर चौकाकडे येणारी वाहतूक सरळ व उजवीकडे न जाता ती डाव्या बाजुकडे वळून मोरवाडी चौकमार्गे जाईल.

परशुराम चौकाकडून खंडोबामाळ चौकाकडे जाण्यास वाहनांना बंदी असून ही वाहतूक आरडी आगा थरमॅक्स चौकमार्गे जाईल.

केएसबी चौकाकडून महावीर चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असून या मार्गावरील वाहने बसवेश्वर चौकातून डावीकडे वळून आटो क्लस्टरमार्गे जातील.

निगडी वाहतूक विभाग

थरमॅक्स चौकाकडून येणारी वाहतूक आरडी आगा मार्गाकडून गरवारे कपंनी कंपाऊडपर्यंत येऊन तेथील टी जंक्शनवरून खंडोबामाळ चौकाकडे न जाता डावीकडून परशुराम चौकाकडून मोहननगर चिंचवडमार्गे जाईल.

दळवीनगर पुलाकडून व आकुर्डी गावठाणातून येणारी वाहतूक खंडोबामाळ चौकाकडे न येता गणेश व्हिजनमार्ग व आकुर्डी गावठाणमार्गे जाईल.

दुर्गा चौकाकडून येणारी वाहतूक टिळक चौकाकडे न येता थरमॅक्स चौकाकडे किंवा यमुनानगरमार्गे जाईल.

भेळ चौकाकडून येणारी वाहतूक टिळक चौकाकडे न येता सावली हॉटेलमार्गे जाईल.

अप्पुघर/रावेतकडून येणारी वाहतूक व ट्रान्सपोर्टनगरमधून येणारी वाहतूक भक्तीशक्ती पुलावर न चढता भक्तीशक्ती सर्कलखालच्या भुयारी मार्गाने (अंडरपासमधून) अंकुश चौक, त्रिवेणीनगरमार्गे जाईल.

त्रिवेणीनगर, अंकुश चौकाकडून भक्तीशक्ती चौकाकडून देहुरोडकडे जाणारी वाहतूक भक्तीशक्ती सर्कलखालच्या भुयारी मार्गाने सरळ अप्पूघर रावेतमार्गे देहुरोड मुंबईकडे जाईल.

देहूरोडकडून येणारी वाहतूक भक्तीशक्ती सर्कलवरून त्रिवेणीनगर चौकाकडे वळतील किंवा पुनागेट

हॉटेलसमोरून भक्तीशक्ती उड्डाणपुलावरून सरळ ग्रेडसेपरेटरमधून जाईल,

भक्तीशक्तीकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक वळवून संत तुकाराम महाराज पूलमार्गे जाईल.

भोसरी वाहतूक विभाग

पुणे, खडकी, दापोडी, फुगेवाडी बाजूकडून भक्तीशक्ती चौकाकडे जाणारी वाहने भक्तीशक्ती चौकाकडे न जाता नाशिक फाट्यावरून मोशी चौक किंवा कस्पटे चौकमार्गे जातील.

चाकण, मोशी, आळंदी बाजूकडून नाशिक फाटामार्गे मुंबई बाजूकडे जाणारी वाहने पांजरपोळ जंक्शनवरून स्पाईन रोडने त्रिवेणीनगर, 'भक्तीशक्ती अंडरपासमधून रावेतमार्गे जातील किंवा नाशिक फाटा, कस्पटे चौक, वाकड नाकामार्गे जातील.

देहूरोड वाहतूक विभाग

तळवडेकडून देहूकमान, जुना मुंबई-पुणे महामार्गाकडे येणारी वाहतूक पूर्ण बंद करून देहुगावमार्ग जाईल. - मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरून येणारी वाहतूक सोमाटणे एक्झिट, देहुरोड एक्झिट पूर्णपणे बंद करून बेंगळूर महामार्गाने जाईल.

बेंगळूर महामार्गाने मुंबईकडे जाणारी वाहतूक किवळे पुलाकडून जुन्या महामार्गाने येण्यास बंदी असून जड, अवजड व छोटी वाहने द्रुतगती मार्गाने जातील. तसेच दुचाकी वाहने किवळे पंक्चरमधून कृष्णा चौक लोढा स्किम-गहुंजेगावमार्गे जातील.

मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक सेंट्रल चौकातून बेंगळूर महामार्गाने जाईल. पदयात्रा जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने जाणार आहे. त्यामुळे पदयात्रा भक्तीशक्ती चौकात आल्यानंतर वडगाव चौकातून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येईल.

तळेगाव वाहतूक विभाग

तळेगाव चाकण रस्ता '५४८ डी'वरील मुंबईच्या दिशेने जाणारी जड व अवजड वाहतुकीस प्रवेश बंदी करून या मार्गावरील वाहने महाळुंगे वाहतूक विभागातील एचपी चौकमार्गे जातील. तळेगाव गावठाणकडून लिंब फाट्याकडे येणारी वाहतूक सरळ व उजवीकडे न जाता डाव्या बाजूने जाईल. बेलाडोरमार्गे एबीसी पेट्रोलपंप चौकात येणारी वाहतूक सरळ व उजवीकडे न जाता डाव्या बाजूने जाईल.

Whats_app_banner