Maratha Reservation : मनोज जरांगेंचा झंजावात आज पुण्यात! मोर्चावेळी पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये वाहतुकीत मोठे बदल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maratha Reservation : मनोज जरांगेंचा झंजावात आज पुण्यात! मोर्चावेळी पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये वाहतुकीत मोठे बदल

Maratha Reservation : मनोज जरांगेंचा झंजावात आज पुण्यात! मोर्चावेळी पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये वाहतुकीत मोठे बदल

Updated Jan 23, 2024 06:34 AM IST

Maratha Reservation protest in Pune : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे पदयात्रा नेणार आहेत. हा मोर्चा आज पुण्यात दाखल होणार आहे. मोठ्या प्रमाणात आंदोलक येणार असल्याने पुण्याच्या वाहतुकीत आज मोठे बदल करण्यात आले आहेत.

Maratha Reservation activist Manoj Jarange Patil
Maratha Reservation activist Manoj Jarange Patil (HT_PRINT)

Pune traffic changes in Pune for maratha proteste : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा ही मुंबईला निघाली आहे. ही पदयात्रा आज पुण्यातून मुंबईच्या दिशेने जाणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील आज पुण्यात देखील निदर्शने करणार आहे. त्यांच्या या मोर्चात हजारो नागरिक सहभागी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. त्यामुळे जर आज घराबाहेर पडणार असाल तर वाहतुकीचे नियोजन पाहून बाहेर पाडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Mumbai Pune express way: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर आज २ तासांचा मेगाब्लॉक; 'या' वेळेत वाहतूक बंद

मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेली पदयात्रा ही आज मंगळवारी (दि २३) नगर रस्त्यावरील खराडी परिसरात दाखल होणार आहे. मनोज जरांगे पाटील आणि हजारो समर्थक नगर रस्त्यावरील रांजणगाव, कोरेगाव भीमामार्गे खराडी-वाघोली परिसरात मुक्कामी येणार असल्याने नगर रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.

नगर रस्त्यावरील वाहतूक मंगळवारी पहाटे तीननंतर हळू हळू वळविण्यात येणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून नगरकडे जाणारी वाहने कात्रज, खडी मशिन चौक, मंतरवाडी फाटा, हडपसरमार्गे सोलापूर रस्ता, केडगाव चौफुलामार्गे, न्हावरे, शिरुरमार्गे नगर रस्त्याकडे वळवण्यात आली आहे. तर वाघोली, लोणीकंदमार्गे नगरकडे जाणारी वाहतूक ही थेऊर फाटामार्गे सोलापूर रस्त्याकडे वळविण्यात आली आहे. तर ही वाहतूक तेथून केडगाव चौफुला, न्हावरे, शिरुरमार्गे नगरकडे वळविण्यात आली आहे.

Maratha Reservation : मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षण मोहिमेला उद्यापासून सुरूवात, यंत्रणा सज्ज

पुणे शहरातून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बायपास चौकातून उजवीकडे वळून मगरपट्टा चौक, सोलापूर रस्ता, यवत, केडगाव चौफुला, न्हावरे, शिरुरमार्गे नगरकडे जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले आहे.

बुधवारी (दि २४ ) सकाळी पदयात्रा मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे. त्यानंतर पदयात्रा पिंपरी-चिंचवड शहरात दाखल होणार असल्याने तेथून पदयात्रा लोणावळ्याकडे जाणार आहे. बुधवारी नगर रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. नगरकडून पुण्यात येणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. थेऊर फाटा, केसनंद, थेऊरमार्गे वाहतूक सोलापूर रस्त्याने पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. वाघोली परिसरातील वाहतूक वाघोली, आव्हाळवाडी, मांजरी, केशवनगर, मुंढवा चौकमार्गे वळविली जाणार आहे. पुण्यातून नगरकडे जाणारी वाहतूक येरवड्यातील चंद्रमा चौक, आळंदी रस्ता, विश्रांतवाडी, धानोरी, लोहगावमार्गे वाघोलीकडे वळविण्यात येणार आहे.

मराठा आरक्षण मोर्चाची जय्यत तयारी

जरांगे पाटील यांचा झंझावात आज पुणे जिल्ह्यात येणार आहे. या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जरांगे यांच्यासह हजारो समर्थक वाघोलीतील चोखीदाणी, खराडी परिसरात मुक्कामी असणार आहेत. या ठिकाणी आंदोलकांची गैरसोय होऊ नये या साठी पाण्याचे टँकर, आरोग्य सुविधा, देण्यात आली आहे. तर यात्रेदरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी एक हजार पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या, दंगल नियंत्रक पथक, गृहरक्षक दलाचे ८०० जवान तैनात करण्यात आले आहे. राहणार आहेत. या सोबतच झोन चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्यासह २ पोलीस उपायुक्त, सहा सहायक पोलीस आयुक्त, २८ पोलीस निरीक्षक, १२३ सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, तसेच १ हजार पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या आज पुण्यात तैनात करण्यात आल्या आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर