मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरची वेळ दिली होती. त्यानंतर सरकारने या मुद्द्यावर फेब्रवारीत विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा केली. मात्र आरक्षणासाठी फेब्रुवारीपर्यंत थांबणार नसल्याचे म्हणत जरांगे पाटलांनी मुंबईतील आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. २० जानेवारी रोजी मुंबईत तिसऱ्यांदा उपोषण आंदोलन होणार आहे. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलण्यासाठी छगन भुजबळांना अजित पवारांनीच पुढं केल्याचा आरोप केला आहे.
अंबड येथे आयोजित पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले, अजित पवारांनी मराठा आक्षणाच्या विरोधातच आधीपासून काम केले आहे. तुमच्या पक्षातील माणूसच मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत होता. तुम्हीच त्यांना आधीपासून पाठिंबा देत होता का? आताच्या तुमच्या बोलण्यावरुन हेच लक्षात येत आहे. तुम्हीच त्या व्यक्तीला मराठ्यांच्या विरोधात पुढं केलंत हेच लक्षात येत, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी जित पवारांवर केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काहीही झालं तरी येत्या २० जानेवारीलाआम्ही मुंबईत धडकणारच, असा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केलाहोता.तर, कुणीही कायदा हातात घेतला तर त्याचा मुलाहिजा ठेवणार नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरांगे पाटलांना इशारा दिला आहे.
अजित पवारांनी दिलेल्या इशाऱ्याबाबतच्या प्रश्नावर जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्यांना तुमच्या विरोधात बोलायला लावू नका, तुम्हाला हे शेवटचं सांगणे आहे. अन्यथा तुमच्याकडे बघावं लागेल. तुम्ही अपघाताने झालेले उपमुख्यमंत्री आहात, तुम्हाला मराठा समाज उत्तर देईल, विनाकारण मराठ्यांच्या विरोधात काहीही भाष्य करून मराठा समाज आणि सरकारमध्ये गैरसमज निर्माण करू नका. तुम्हाला बोलायचे तर मराठ्यांच्या बाजूने बोला, अन्यथा आत्तापर्यंत तुम्ही जसे गप्प बसला तसेच पुढंही बसा. याच्यासाठीच तुम्ही गप्प बसला होतात का? असा सवालही जरांगे- पाटील यांनी उपस्थित केला.
संबंधित बातम्या