Manoj Jarange : देवेंद्र फडणवीसांची जिरवणारच! १ सप्टेंबरला मालवणला जाण्याची मनोज जरांगे-पाटील यांची घोषणा-manoj jarange patil criticize devendra fadnavis on rajkot shivaji maharaj statue accident maharashtra politics ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manoj Jarange : देवेंद्र फडणवीसांची जिरवणारच! १ सप्टेंबरला मालवणला जाण्याची मनोज जरांगे-पाटील यांची घोषणा

Manoj Jarange : देवेंद्र फडणवीसांची जिरवणारच! १ सप्टेंबरला मालवणला जाण्याची मनोज जरांगे-पाटील यांची घोषणा

Aug 29, 2024 05:39 PM IST

Manoj Jarange Patil : मालवण येथील राजकोट येथे उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच यावरून राजकीय वादही सुरू आहेत. या वादात आता मनोज जरांगे पाटील यांनी उडी घेतली आहे. त्यांनी यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीसांची जीरवणारच! जरांगे पाटलांचा पुन्हा हल्लाबोल; १ तारखेला राजकोटला भेट देणार
देवेंद्र फडणवीसांची जीरवणारच! जरांगे पाटलांचा पुन्हा हल्लाबोल; १ तारखेला राजकोटला भेट देणार

Manoj Jarange Patil : मालवण येथील राजकोट येथे नौदलदिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यात राजकीय वादंग उठलं आहे. अनेकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या वादात आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील उडी घेतली आहे. येत्या १ तारखेला राजकोट येथे भेट देणार असून मला देवेंद्र फडणवीस अडवणार आहे का ? असे म्हणत त्यांची जिरवणारचं असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे. आंतरवली सराटी येथे प्रसार मध्यमांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर फडणवीस काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. माहाविकास आघाडीकडून या विरोधात राज्यभर आंदोलन सुरू आहे. त्यात आता जरांगे पाटील यांनी उडी घेतली आहे. आंतरवली सराटी येथे प्रसार मध्यमांशी जरांगे पाटील यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली. या सोबतच १ सप्टेंबरला राजकोट येथे जाण्याची घोषणा देखील त्यांनी केली.

काय म्हणाले जरांगे पाटील ?

मनोज जरांगे पाटील म्हणाले, छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळणे ही दुर्दैवी बाब आहे. या घटनेमुळे राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे मी १ तारखेला राजकोट येथे जाऊन पहाणी करणार आहे. मला राजकोट किल्ल्यावर जायला देवेंद्र फडणवीस अडवणार आहेत का? मी तेथे जाऊन देवेंद्र फडणवीस यांची जिरवणार आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

राजकारणासाठी छत्रपती शिवरायांच्या नावाचा वापर करु नका मी असे यापूर्वीही म्हटलं आहे. या प्रकरणी उद्घाटन करणाऱ्याचा दोष नसून काम करणाऱ्याला शोधून त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. कोणत्याही महापुरुषाच्या स्मारकाच बांधकाम हे चांगलचं केलं पाहिजे. राजकोट हे संवेदनशील ठिकाण आहे का ? ती काय भारत पाकिस्तानची बॉर्डर आहे काय? मी १ तारखेला राजकोटला जाणार असून आरक्षणाचा गनिमीकावा देवेंद्र फडणवीस यांना ओळखू देणार नाही असे देखील जरांगे पाटील म्हणाले.

विभाग