क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीसः मनोज जरांगे पाटील
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीसः मनोज जरांगे पाटील

क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीसः मनोज जरांगे पाटील

HT Marathi Desk HT Marathi
Updated Mar 22, 2025 02:20 PM IST

Manoj Jarange Patil - मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केली आहे. क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी टिका केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका
मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केली आहे. फडणवीस यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाचा फक्त वापर केला आहे. क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी टिका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा नागपूरस्थित पत्रकार प्रशांत कोरटकर अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. यावर मनोज जरांगे पाटील यांनी टिकास्त्र सोडले. प्रशांत कोरटकर कसा सापडत नाही, तो काय सरकारचा सोयरा आहे काय, असं जरांगे म्हणाले. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ' प्रशांत कोरटकर सरकारचा सोयरा आहे ना. त्यामुळे तो पोलिसांना सापडणार नाही. बाकीचे असते तर कशात तरी आतमध्ये टाकले असते. प्रशांत कोरटकरवर सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून जेवढ्या मकोकासारख्या कलमे आहेत, तेवढी कलमे लावले पाहिजे. तुम्हाला जर खरंच छत्रपतींचे प्रेम आहे ना, हिंदूतले काही जण रोज छत्रपतींचा अवमान करत आहे. त्यांनी फक्त आमचा वापर भांडणासाठी केलाय आणि त्यांच्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या आहेत. क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस आहे. माझ्या समाजाचा नुसता वापर केला. तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही, आणि ते नकोय. आम्हाला छत्रपतींचा हिंदुत्व मान्य आहे. आता फक्त निषेध करून चालणार नाही. महापुरुषांवर बोलणाऱ्यांना धडा शिकवावाच लागेल, असा हल्लाबोल जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. 

प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडत नाही, हे पोलिसांचे अपयश नाही. हे सगळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घडवून आणत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारे सगळे त्यांचे सोयरे आहेत. त्यांनी एक टोळी तयार केली आहे. ती छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महापुरुषांचा अपमान करते. ते फक्त दाखवायला हिंदू दाखवतात. त्यांना बळ कोण देतं? त्यांना बोलायचं कोण सांगतं? देवेंद्र फडणवीस फक्त गोरगरिबाच्या लेकरांचं वाटोळं करू शकतात. त्यांनी काही जण फक्त जाणून-बुजून अवमान करण्यासाठी ठेवले आहेत. हिंदू-हिंदू म्हणून आमचा घात किती दिवस करायचा आहे? मराठा जात ही धर्माचे रक्षण करणारी जात आहे, तुम्ही तिला संपवायला लागलात, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या