Manoj Jarange Patil health : पुण्यात रविवारी स्वारगेट येथे मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅलीच जल्लोषात स्वागत करण्यात आले. या रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांनी या रॅलीत सहभाग घेतला होता. या रॅलीत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर, देवेंद्र फडणवीस व भुजबळांवर टीका केली. या रॅली नंतर मात्र, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना भोवळ आळल्याने त्यांना पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.
पुण्यात रविवारी जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीसाठी मोठी तयारी करण्यात आली होती. दुपारी १२ च्या सुमारास ही रॅली पुण्यात आयोजित करण्यात आली होती. स्वारगेट ते कात्रज चौकात ही रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीला मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांनी सहभाग घेतला. यावेळी झालेल्या सभेत जरांगे पाटलांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या मागण्यासाठी मी जीव द्यायला देखील तयार आहे. शिंदे आणि फडणवीस यांची आमच्या मागण्या पूर्ण करायला हव्या. या लोकांनी मला मला चारही बाजूने घेरले आहे. त्यामुळे आता मराठा आंदोलकांनी एकजूट राहण्याची वेळ आली आहे.
मनोज जरांगे पतील यांनी देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबल यांच्यावर जोरदार टीका केली. फडणवीस, भुजबळ यांना दंगली घडवायची आहे असा आरोप त्यांनी केला. जरांगे म्हणाले, मराठ्यांनी ओबीसींच्या अंगावर जाऊ नका आणि त्यांनी पण मराठ्यांच्या अंगावर जाऊ नये. राज्य शांत ठेवा. मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या केसाला पण धक्का लागणार नाही, असे जरांगे पतील म्हणाले. फडणवीस व भुजबळ यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. त्यांनी जेवढं रक्त आमच्या आई बहिनींचे सांडायचे तेवढे सांडवले आहे. त्यामुळे सगे सोयरे आरक्षणासाठी सरकार पाडायचे. काही जणांना मस्ती आली असून आता पुनः मुंबईला चक्कर हाणायची वेळ आली आहे, असे देखील जरांगे पाटील म्हणाले.