manoj jarange : जालना, बीड, नगर ओलांडून मनोज जरांगे पाटलांसह मराठा वादळ पुण्यात धडकले!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  manoj jarange : जालना, बीड, नगर ओलांडून मनोज जरांगे पाटलांसह मराठा वादळ पुण्यात धडकले!

manoj jarange : जालना, बीड, नगर ओलांडून मनोज जरांगे पाटलांसह मराठा वादळ पुण्यात धडकले!

Jan 23, 2024 11:37 AM IST

Manoj jarange morcha Maratha Aarakshan : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची पायी दिंडी ही पुणे जिल्ह्यात पोहचली आहे. आज ही दिंडी पुण्यात मुक्काम करणार आहे. पोलिसांनी या पार्श्वभूमीवर पुण्यात चोख बंदोबस्त ठेवला आहे.

manoj jarange patil
manoj jarange patil

Manoj jarange patil Maratha Reservation protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईवर धडक मोर्चा काढला आहे. जालना येथील आंतरवली सराटी येथून पायी दिंडी काढत मजोज जरांगे पाटील हजारो मराठा आंदोलकांसह मुंबईला निघाले आहे. ते २६ जानेवारी रोजी मुंबईला पोहचणार आहे. दरम्यान, ही मराठा आरक्षण पायी दिंडी, जालना, बीड, नगर ओलांडून आज पुणे जिल्ह्यात आली आहे. आज पुण्यातील शिरूर तालुक्यातिल रांजनगाव गणपती येथे रात्री मुक्काम केला असून ते दुपारी कोरेगाव भीमा येथे जेवण करणार आहे. तर चंदननगर येथे ते मुक्काम करणार आहेत.

Maratha Reservation : मनोज जरांगेंचा झंजावात आज पुण्यात! मोर्चावेळी पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये वाहतुकीत मोठे बदल

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उभारले आहे. त्यांनी आंतरवाली सराटीत आमरण उपोषण केले होते. तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी सरकारला अल्टीमेटम देखील दिला होता. मात्र, अद्याप सरकारने यावर तोडगा काढला नाही. त्यामुळे त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर अमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. यासाठी जरांगे पाटील यांनी २० जानेवारीपासून आंतरवाली सराटी येथून दिंडी काढली आहे. या दिंडीचा आज चौथा दिवस आहे. जरांगे पाटील यांचा मोर्चा जालना, बीड, नगर जिल्हा ओलांडून आत पुणे जिल्ह्यात आला आहे.

‘राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा हा भारतीय लोकशाहीवरील काळा डाग’! राम मंदिरावरून पाकिस्तानचे पित्त खवळले

मजोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन स्थगित करावे या साठी सरकार आणि अनेक नेतेमंडळी त्यांना विनंती करत आहेत. मात्र, जरांगे पाटील हे त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत.

जरांगे पाटील हे रात्री शिरूर तालुक्यातिल रांजनगाव गणपती येथे पोहचले आहे. आज सकाळी १० वाजता पुन्हा ते त्यांचा प्रवास सुरू करणार आहेत. दरम्यान, दुपारी ते कोरेगाव भीमा येथे पोहचणार असून येथून जेवण आटोपून ते रात्री खराडी बायपास येथील चंदननगर येथे मुक्काम करणार आहेत.

बुधवारी ते पुण्यातून पिंपरीचिंचवड येथे येणार आहे. ते जगताप डेअरी, डांगे चौक, चिंचवड, देहूफाटा असा प्रवास करून रात्री लोणावळा येथे मुक्काम करणार आहेत. तर २५ जानेवारी रोजी ते पनवेल येथे दुपारी भोजन करून वाशी येथे रात्री मुक्काम करणार आहेत. २६ जानेवारीला चेंबूर वरून पदयात्रा सुरू करून ते आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कवर उपोषण सुरु होणार आहे.

आज जरांगे पाटील हे हजारो आंदोलकांसोबत पुण्यात आले आहे. यंनिमित पुण्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आंदोलकांची गैरसोय होऊ नये या साठी पाण्याचे टँकर, आरोग्य सुविधा, देण्यात आली आहे. तर यात्रेदरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी एक हजार पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या, दंगल नियंत्रक पथक, गृहरक्षक दलाचे ८०० जवान तैनात करण्यात आले आहे. राहणार आहेत. या सोबतच झोन चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्यासह २ पोलीस उपायुक्त, सहा सहायक पोलीस आयुक्त, २८ पोलीस निरीक्षक, १२३ सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, तसेच १ हजार पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या आज पुण्यात तैनात करण्यात आल्या आहेत.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर