manoj jarange patil : आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही; मराठा आरक्षणाबाबत जरांगे-पाटील भावुक, आंदोलक मुंबईला रवाना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  manoj jarange patil : आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही; मराठा आरक्षणाबाबत जरांगे-पाटील भावुक, आंदोलक मुंबईला रवाना

manoj jarange patil : आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही; मराठा आरक्षणाबाबत जरांगे-पाटील भावुक, आंदोलक मुंबईला रवाना

Jan 20, 2024 11:42 AM IST

manoj jarange patil Protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपला मोर्चा मुंबईच्या दिशेने वळवला आहे. हजारो कार्यकर्त्यांसह ते २६ जानेवारीला मुंबईला पोहचणार आहे. दरम्यान, आज पत्रकरांची बोलतांना ते भावूक झाले होते.

manoj jarange patil Maratha reservation Protest
manoj jarange patil Maratha reservation Protest

manoj jarange patil Maratha reservation Protest : एवढं निर्दयी सरकार आज पर्यंत पाहिले नाही. आता गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही असं म्हणत आंतरवली सराटी येथून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे आपला मोर्चा वळवला. यावेळी त्यांनी, पत्रकार परिषद घेत आपली भूमिका देखील स्पष्ट केली. दरम्यान, आरक्षणाविषयी बोलतांना मनोज जरांगे पाटील भावुक झाले. यावेळी हजारो कार्यकर्त्यांचा देखील गळा दाटून आला होता.

TataMarathon : मुंबईकरांनो, उद्या, रविवारी घराबाहेर पडणार असाल तर 'हे' वाचा; मॅरेथॉनमुळे अनेक रस्ते बंद राहणार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील हजारो मराठा बांधवांसह ते मुंबईला पायी मोर्चा नेणार आहे. जरांगे पाटील हे मुंबईत २६ जानेवारी पासून उपोषणाला बसणार आहे. मात्र, ते आजपासूनच उपोषण सुरू करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी मांस-मच्छी विक्रीस बंदी, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त निर्णय

जरांगे पाटील म्हणाले, हे सरकार निर्दयी आहे. माराठ्यांच्या मुलांचे यांना देणे घेणे नाही. आता पर्यंत आम्ही सामंजस्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे तब्बल ७ महिन्यांचा अवधी सरकारला दिला. मात्र, सरकार अजूनही कोणताच निर्णय घेत नाही. आता पर्यंत तब्बल ५४ लाख नोंदी मिळाल्या आहेत. पण त्यांना अद्यापही देखील प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे आम्हाला बैठकीसाठी बोलावले असतांना आम्ही का बैठकीत सामील व्हायचं असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.

पाटील म्हणाले, आम्ही मराठा आरक्षणासाठी तब्बल ४५ वर्षांपासून लढत आहोत. आतापर्यंत २५० जणांनी आरक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. मात्र, सरकार अजूनही मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गांभीर्याने घेताना दिसत नाही. हे सरकार एवढे निर्दयी कसे असू शकते? ज्या मराठ्यांनी सरकारला सत्तेत बसवले तेच सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही? हे भयानक आहे. आमच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. आमच्यावर लाठ्या चालवल्या तरी सुद्धा आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत. आता मुंबईला जाण्याची घोषणा करून देखील सरकार आरक्षणाचा मुद्दा हा गांभीर्याने घेत नाही हा आंच्यावरील अन्यायाचा कळस आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं, तर मुंबईकडे जाण्याची वेळ आली नसती. मुंबईत काहीही झालं तरी हरकत नाही, पण आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर