Manohar joshi and Pune land sacm : राज्यात पहिल्यांदाच शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर १९९५ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री होण्याचा मान दिला. मुख्यमंत्री पदाचा भव्य शपथ विधी देखील शिवाजी पार्कवर झाला होता. दरम्यान, चार वर्षांनंतर पुण्यातील एका भूखंडावरून मनोहर जोशी यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. या भूखंडावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यावर थेट बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा द्या असा आदेश दिल्यावर त्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले होते.
मनोहर जोशी मुख्यमंत्री असतांना त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले होते. त्यांची करकरकीर्द व्यवस्थित सुरू असतांना १९९९ मध्ये त्यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले. पुण्यातील प्रभात रोड ३० हजार स्क्वेअर फुटांचा प्लॉट (क्र. ११०) हा त्यांनी त्यांचे जावई गिरीश व्यास यांनी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. हा भूखंड शाळेसाठी राखून ठेवण्यात आला होता. मात्र, मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांच्यासाठी या भूखंडाचे आरक्षण बदलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच मुख्यमंत्री जोशी ही आपल्या मर्जिने कारभार चावतात असे देखील आरोप त्यांकयावर झाले होते. या आरोपांची दाखल थेट मातोश्रीने घेतली.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या आरोपांची गंभीर दखल घेत जोशी यांना पत्र पाठवले, तु्म्ही आता जेथेही असाल तेथे, कृपया सर्वकाही थांबवा. महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करुन मला भेटायला या, असा या पत्रात लिहिले होते. मातोश्रीवरुन आलेला हा आदेश जोशी यांनी पाळला. तसेच कोणतीही कुरकुर न करता त्यांनी तात्काळ राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत, बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती.
दरम्यान, या प्रकरणी मनोहर जोशी यांच्याविरोधात चौकशी समिती नेमण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला होता. हा निर्णय पुढे सुप्रीम कोर्टाने रद्द केला. मनोहर जोशी यांचे कोहिनूर कंपनीचे हॉटेल देखील पुण्याच्या आपटे रोड वर आहे. ते जेव्हा पुण्यात येत असतं तेव्हा या ठिकाणी मुक्कामी थांबत असतं.