मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivsena : धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास शिंदे गटाकडे ‘तलवार’ तर उद्धव ठाकरेंकडे ‘हा’ असेल पर्याय?

Shivsena : धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास शिंदे गटाकडे ‘तलवार’ तर उद्धव ठाकरेंकडे ‘हा’ असेल पर्याय?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 06, 2022 08:01 PM IST

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यास उद्धव ठाकरे कोणते चिन्ह वापरणार यावर शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना निवडणूक चिन्ह
शिवसेना निवडणूक चिन्ह

मुंबई – तीन महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला खिंडार पडले असून पक्षात सरळ सरळ उभी फूट पडली आहे. या बंडाळीनंतर शिवसेनेतील ठाकरे गट व शिंदे हटात वर्चस्वासाठी संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटाकडून पक्षावर व पक्षाच्या चिन्हावर दावा सांगितला जात आहे. शिवसेनेतील सत्तासंघर्षातील ही लढाईआता सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचली आहे.

दसऱ्यानिमित्त मुंबईत पार पडलेल्या दोन्ही गटाच्या मेळाव्यातही ही गोष्ट प्रकर्षाने दिसून आली. या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानभा पोटनिवडणुका जाहीर केल्या असून मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. शिवसेनेकडे सध्या तरी धनुष्यबाण चिन्ह आहे. मात्र शिंदे गटाकडे अद्यार निवडणूक चिन्ह नसल्याने त्यांना अंधेरी पोटनिवडणूक लढवता येणार नाही. दरम्यान शिवसेनेलाही या निवडणुकीसाठी धनुष्यबाण मिळू नये, अशी मागणी शिंदे गटाकडून आयोगाकडे केली जाऊ शकते. दरम्यान निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यास उद्धव ठाकरे कोणते चिन्ह वापरणार यावर शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यास उद्धव ठाकरे समर्थकांकडून गदा या चिन्हाचा वापर केला जाऊ शकतो. तसा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावर बोलताना शिवसेना पक्ष कोणाचा हे निवडणूक आयोग ठरवणार आहे. पक्षचिन्हाबाबत काय होणार? याबाबत कोणालाही माहिती नाही. या सर्व जर तरच्या चर्चा आहेत. आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळेल असा विश्वास आहे. तरीदेखील निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले तर आम्ही विचार करू. त्यानंतर जे ठरेल ते निश्चितच सार्वजनिक केले जाईल,अ शी प्रतिक्रिया मनिषा कायंदे यांनी दिली.

दुसरीकडे धनुष्यबाण चिन्ह न मिळाल्यास एकनाथ शिंदे गटाकडून तलवार चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला जाऊ शकतो. दसरा मेळाव्यात शिंदे यांच्या हस्ते १५ फुटी तलवारीच्या प्रतिकृतीचे पूजन करण्यात आले होते. त्यामुळे शिंदे गट तलवार तर ठाकरे गट गदा चिन्हासाठी प्रयत्न करू शकतात.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या