Mohan Bhagwat on Manipur : ईशान्येकडील मणिपूर हे राज्य गेल्या एक वर्षापासून हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. ३ मे २०२३ पासून येथे जातीय हिंसाचार उसळला आहे. या ठिकाणी तेव्हापासून अनेक हिंसक घटना घडल्या आहेत. हिंसाचाराची ही धग अद्यापही कमी झालेली नाही. त्यामुळे मणिपूरमध्ये प्राध्यान्याने शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. मोहन भागवत म्हणाले, "मणिपूर वर्षभरापासून शांततेची वाट पाहत आहे. याचा प्राधान्याने विचार व्हायला हवा.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी मणिपूरमधील हिंसाचार आणि निवडणुकांबाबत मोठे विधान करत सरकारला मोलाचा सल्ला दिला आहे. दरम्यान, भागवत यांच्या या आवाहनाकडे मोदी सरकार कसे लक्ष देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोप कार्यक्रमात मोहन भागवत यांनी वरील विधान केले, भागवत म्हणाले, आम्ही जनमत जागृत करण्याचे काम केले आहे. खरा सेवक हा शिष्टाचाराचे पालन करतो. काम करा, पण मी करून दाखवले याचा अभिमान बाळगू नका. जो याचे पालन करतो तोच खरा सेवक आहे, असेही भागवत म्हणाले.
मोहन भागवत म्हणाले, देशात शांतता असावी. प्रत्येक ठिकाणी आणि समाजात विसंवाद नसावा. मणिपूर वर्षभरापासून शांततेची वाट पाहत आहे. त्यापूर्वी माणिपूर तब्बल १० वर्ष धगधगत होते. येथील जून वाद संपले असतील असे वाटत होते. मात्र, हा वाद पुन्हा अचानक उसळला आणि येथील वाद पुन्हा वाढला आहे. मणीपुर येथील विसंवादाची धग गेल्या वर्षभारापासून कायम आहे. येथे शांतता नंदावी अशी मागणी येथील नागरिक करत आहे. त्यामुळे त्याच्याकडे कोण लक्ष देणार? त्याचा सरकारने प्राधान्याने विचार करणे कर्तव्य आहे.
भागवत म्हणाले, चांगल्या कुटुंबातील महिला दारू पिऊन गाडी चालवते आणि लोकांना चिरडते. मग कुठे गेली आपली संस्कृती? संस्कृती आपण तरच समाज टिकेल. त्यामुळे पुढच्या पिढीला आपण आपली संस्कृतीचे योग्य ज्ञान देणे गरजेचे आहे.
निवडणुकीबाबत मोहन भागवत म्हणाले की, ही एकमत निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. संसदेत कोणत्याही प्रश्नाच्या दोन्ही बाजू पुढे याव्यात अशी व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान लोक ज्या प्रकारे एकमेकांवर टीका करतात, तंत्रज्ञानाचा गैरवापर करतात आणि खोटं पसरवतात ते योग्य नाही. प्रतिपक्षाऐवजी प्रतिपक्ष म्हणणे योग्य ठरेल. निवडणुकीच्या आवेशातून शिक्षा घेऊन देशासमोरील समस्यांचा विचार करावा लागेल. मात्र, असे न झाल्याने समाजात तेढ वाढू शकते, हे प्रचारादरम्यान लक्षात घेतले गेले नाही. त्यात संघालाही ओढले गेले. तंत्रज्ञानाचाही गैरवापर झाला. खोटेपणाची सेवा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. असा देश कसा चालेल? शेवटी प्रत्येकालाच देश चालवावा लागतो. निवडणूक लढवताना शिष्टाचार आहेत ज्यांचे पालन केले जात नाही. देशासमोरील आव्हाने संपलेली नाहीत. पुन्हा तेच सरकार आले. गेल्या १० वर्षात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. आर्थिक स्थिती सुधारली आहे. जगभर देशाची प्रतिष्ठा वाढली आहे. कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात आपण पुढे जात आहोत. पण याचा अर्थ असा नाही की आपण आव्हानांपासून मुक्त आहोत. आता निवडणुकीच्या जोशातून मुक्त होऊन भविष्यातील येणाऱ्या येणाऱ्या आव्हानांचा विचार करावा लागणार आहे.