मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manipur violence : मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Airlift, विशेष विमानाने सर्वजण मुंबईत दाखल

Manipur violence : मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Airlift, विशेष विमानाने सर्वजण मुंबईत दाखल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 08, 2023 09:00 PM IST

Students airlift from Manipur : मणिपूरमध्ये अडकलेल्या २५ विद्यार्थ्यांना आज इंफाळमधून विशेष विमानाने आधी गुवाहाटीला आणि नंतर मुंबईत विशेष विमानाने आणले. हे विद्यार्थी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील आहेत.

मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Airlift
मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Airlift

आरक्षणाच्या मुद्यांवरून मणिपूर हिंसाचाराच्या आगीत होरपळत असताना महाराष्ट्रातील विद्यार्थी तेथे अडकले होते. मणिपूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी मदतीसाठी सरकारकडे विनंची केली होती. या विद्यार्थ्यांना आता विशेष विमानाने सुरक्षित महाराष्ट्रात आणले आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विशेष प्रयत्न केले होते.

मणिपूरमध्ये निर्माण झालेली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता ७ मे रोजी होणारी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG पुढे ढकलण्यात आली आहे.

आज मणिपूरमध्ये अडकलेल्या २५ विद्यार्थ्यांना आज इंफाळमधून विशेष विमानाने आधी गुवाहाटीला आणि नंतर मुंबईत विशेष विमानाने आणले. हे विद्यार्थी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारीच प्रशासनाला विशेष विमानाची सोय करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार या विद्यार्थ्यांना एअरलिफ्ट करण्यात आले आहे.

मुंबईत दाखल होताच या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी भारतीय सैन्य दल तसेच महाराष्ट्र सरकारचेआभार मानले आहेत.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी कर्नाटक दौऱ्यावर असताना मणिपूरमध्ये अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद साधला होता. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पुढाकार घेत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती.

 

WhatsApp channel