Vanraj Andekar Murder Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पिस्तूलाने गोळीबार व कोयत्याने हल्ला करत खून केला होता. या प्रकरणी बहीण व जावयाला अटक करण्यात आली आहे. तब्बल १५ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. संपत्तीचा वाद आणि टोळीयुद्धातून ही घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वनराज यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल व कोयते पुरवणाऱ्या अट्टल आरोपीला अटक करण्यात आली आहे.
संगम संपत वाघमारे (वय २०, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आंदेकर यांच्या बहिणीला व जावयासह १५ जणांना आतापर्यंत अटक केली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा तपास करत आहेत. आरोपींना शस्त्रे पुरविण्यात वाघमारे याने मोठी भूमिका बजावली. ही बातमी गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलिस वाघमारेचा शोध घेत होते. गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, हवालदार जाधव, मोकाशी यांच्या पथकाला वाघमारे बाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून वाघमारेला रविवारी अटक केली. त्याला कोर्टात सादर केले असता, ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पुण्यात ३१ ऑगस्टच्या रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हे नाना पेठेत एका कार्यक्रमात गेले असता त्यांच्यावर दुचाकी वरून आलेल्या तब्बल १० ते १५ जणांनी गोळीबार करत कोयत्याने वार करून हत्या केली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली होती. ही घटना सीसीटीव्ही देखील कैद झाली आहे. आंदेकर एकटेच असल्याने त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. दरम्यान पोलिसांच्या तपासात बहीण व जावयाने संपत्ती आणि टोळीयुद्धातून हा खून केल्याचे उघड झाले आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे.
कालिंदी एक्स्प्रेसला घातपात घडवून आणण्याचा कट फसला! रेल्वे ट्रॅकवर ठेवले होते सिलिंडर आणि पेट्रोल बॉम्ब
पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून तसेच सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. मात्र, ही ओळख आता पुसली जात आहे. शहराला गुन्हे नगरी अशी नवी ओळख मिळू लागली आहे. पुण्यात चोरी, बलात्कार, छेडछाड, कोयता गँग, मारामारी या घटना नेमहिच्या झाल्या आहे. किरकोळ कारणावरून एकमेकांची हत्या केली जात आहे. त्यामुळे नागरिक भयभीत असून या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.