Chhatrapati Sambhajinagar Shocking News: छत्रपती संभाजीनगरात फुटपाथवर झोपलेल्या एका व्यक्तीला जिवंत जाळल्याचा प्रकार उघडकीस आला. यामध्ये संबंधित व्यक्ती गंभीररित्या भाजली असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना शुंभनगरातील त्रिशरण चौकार मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेने परिसरात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिपालसिंह रणधीरसिंह गौर असे रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, शाहरूख खान (वय, १९), कृष्णा समाधान (वय, २०) आणि शेख अय्याज शेख मुमताज (वय, ३०) या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. महिपालसिंह यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, त्यांचे गेल्या दोन वर्षांपासून पत्नीसोबत वाद सुरू आहे. यामुळे ते बेघर झाले असून शंभुनगरातील एका दुकानासमोरील फुटपाथवर अधिवास करतात. घटनेच्या दिवशी आरोपी आदिल हा महिपालसिंह बसलेल्या ठिकाणी गेला आणि त्यांना दारू पाजली. पण आदिल शिवीगाळ करत असल्याने महिपालसिंहने त्याला जाण्यास सांगितले. यानंतर आदिल तिथून निघून गेला आणि आपल्या दोन साथीदारासह पुन्हा आला.
महिपालसिंह झोपलेले पाहून आदिलने आपल्या सोबत आणलेले पेट्रोल त्यांच्या अंगावर ओतले आणि पेटवून दिले. यानंतर महिपाल सिंह यांनी बचावासाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तेव्हा आदिल आणि त्याचे साथीदार घटनास्थळावरून पसार झाले. नागरिकांनी आग विझवत महिपालसिंह यांना रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पीडिताचा जबाब नोंदवून आरोपींविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल केला. या घटनेतील मुख्य आरोपी आदिल हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या एका हाताची बोटे कापली गेली. ही घटना ३ जुलै २०२४ रोजी सकाळी ७.३० वाजता घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.
संबंधित बातम्या