Pune viral News : झाडाच्या फांद्या कापायला गेला अन् अडकून पडला! पुण्यात झाडावर अडकलेल्या व्यक्तीची 'अशी' झाली सुटका
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune viral News : झाडाच्या फांद्या कापायला गेला अन् अडकून पडला! पुण्यात झाडावर अडकलेल्या व्यक्तीची 'अशी' झाली सुटका

Pune viral News : झाडाच्या फांद्या कापायला गेला अन् अडकून पडला! पुण्यात झाडावर अडकलेल्या व्यक्तीची 'अशी' झाली सुटका

May 22, 2024 12:14 PM IST

Pune viral News : पुण्यात झाडाच्या वाढलेल्या फांद्या कापण्यासाठी गेलेल्या एक व्यक्ति झाडावरच अडकून पडण्याची घटना आज सकाळी पुण्यातील वानवडी येथील केदारी नगर ऑक्सफर्ड व्हिला सोसायटी येथे घडली. या व्यक्तीला अग्निशामक दलाने सुखरूप खाली उतरवले.

पुण्यात झाडाच्या वाढलेल्या फांद्या कापण्यासाठी गेलेल्या एक व्यक्ति झाडावरच अडकून पडण्याची घटना आज सकाळी पुण्यातील वानवडी येथील केदारी नगर ऑक्सफर्ड व्हिला सोसायटी येथे घडली.
पुण्यात झाडाच्या वाढलेल्या फांद्या कापण्यासाठी गेलेल्या एक व्यक्ति झाडावरच अडकून पडण्याची घटना आज सकाळी पुण्यातील वानवडी येथील केदारी नगर ऑक्सफर्ड व्हिला सोसायटी येथे घडली.

Pune viral News : पुण्यात आज सकाळी एक विचित्र घटना उघडकीस आली. या घटनेची चर्चा सध्या सोशल मिडियावर होत आहे. आज सकाळी एक व्यक्ति झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी एका उंच झाडावर चढला. झाडाच्या फांद्या तोडून झाल्यावर हा व्यक्ति खाली उतरन्याचा प्रयत्न करत असताना त्याला उतरता आले नाही. आपण झाडावरच अडकून पडल्याचे समजल्याने या व्यक्तीने मदतीसाठी ओरडण्यास सुरुवात केली. त्याच्या आवाजाने आजू बाजूचे नागरिक देखील जमा झाले. अखेर ही बाब अग्निशामक दलाला कळली. अग्निशामक दलाचे एक पथक घटनास्थळी आले. एका मोठ्या शिडीच्या साह्याने झाडावर अडकलेल्या या व्यक्तीला सुखरूप खाली आणण्यात आले. ही घटना आज सकाळी पुण्यातील वानवडी येथील केदारी नगर ऑक्सफर्ड व्हिला सोसायटी येथे घडली.

Prashant kishor : नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास पेट्रोल, डिझेलवरही जीएसटी लागणार; प्रशांत किशोर यांचा अंदाज

आज दिनांक २२•०५•२०२४ रोजी सकाळी ०९•३० वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात एक इसम झाडावर अडकला असून मदतीची मागणी करण्याची वर्दि मिळताच अग्निशमन दलाकडून कोंढवा खुर्द अग्निशमन वाहन तसेच मुख्यालयातून एक रेस्क्यू व्हॅन आणि उंच शिडीचे ब्रॉन्टो वाहन अशी एकुण तीन वाहने रवाना करण्यात आले होते.

Lust in Astrology: 'या' राशींमध्ये असते अधिक वासनेची भावना! पाहा तुमची रास ‘कामुक’ गटात आहे का?

इसम रामा पवार (वय २८, रा. वानवडी) असे झाडावर अडकलेल्या व्यक्तिचे नाव आहे. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप त्याला खाली उतरवल्याने त्याने अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, वानवडी येथील केदारी नगर ऑक्सफर्ड व्हिला सोसायटी येथे एका ३० ते ३५ फुट उंच झाडावरच्या फांद्या तोडण्यासाठी रामा हा झाडावर चढला. त्याने फांद्या तोडण्यास सुरुवात केली. फांद्या तोडून झाल्यावर रामा खाली उतरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याला उतरता येत नव्हते. आपण अडकून पडलो हे कळल्याने तो मदतीसाठी ओरडण्यास सुरुवात केली. याची माहिती मिळताच पुणे अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांना एका झाडावर एक व्यक्ति अडकून पडल्याचे दिसले.

Viral News : वडिलांना साप चावल्याने मृत्यू! मुलीचे त्यांना जिवंत करण्यासाठी भर रुग्णालयात सुरू केले मंत्र पठण

एका उंच झाडावर सुमारे तीस ते पस्तीस फुट उंचीवर एक इसम अडकलेल्या अवस्थेत असून मदतीकरिता मागणी करत असल्याचे पाहताच तातडीने झाडाच्या येथे शिडी लावून जवान झाडावर चढत त्याठिकाणी पोहोचले. रामा हा अत्यंत घाबरलेल्या स्थितीत होता. जवानांनी प्रथम त्याच्याशी संवाद साधत "आम्ही आलो आहोत, तुम्ही काळजी करु नका" असे सांगत धीर दिला. तिथे आजुबाजूला असणाऱ्या फांद्या "ट्रि प्रुनर" या उपकरणाने छाटून त्याच्या जवळ जाऊन दोरीच्या साह्याने सुमारे पंधरा मिनिटात त्याला सुखरुप खाली उतरविले. या घटनेत रामा पवार हा किरकोळ स्वरूपात जखमी असल्याने व ते घाबरलेल्या परिस्थितीत असल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात रवाना करण्यात आले. अडकलेला इसम हा झाडाच्या फांद्याची छाटणी करण्याकरिता वर चढला होता असे समजले.

ही कामगिरीत अग्निशमन अधिकारी समीर शेख, कैलास शिंदे व तांडेल राहुल बांदल आणि वाहनचालक राहुल जाधव, चिमेंद्र पवार तसेच फायरमन किशोर कारभार, प्रसाद शिंदे, रामराज बागल, संतोष माने, सागर शिर्के, तेजस पटेल, प्रथमेश सागवेकर, वैभव बकरे यांनी सहभाग घेतला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर