Man Kills Wife Over Infidelity Suspicion In Palghar: पालघर जिल्ह्यातील पेल्हार पोलिसांनी वसई येथे एका व्यक्तीने पत्नीची हत्या करून मृतदेह १२ तास फ्रीजमध्ये ठेवला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. मृत महिलेला परिसरातील एका व्यक्तीसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर आरोपीने तिची हत्या केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
खुर्शीदा खातून चौधरी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, इस्माईल अब्दुल कयूम चौधरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जूनमध्ये लग्न झालेले हे जोडपे वसईच्या कमन परिसरात राहत होते. परंतु, खुर्शीदा हिचे परिसरातील एका व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा तिचा पती स्माईल अब्दुल कयूम चौधरी याला संशय होता. घटनेच्या दिवशी कामावर गेलेला आरोपी लंब ब्रेक घेऊन घरी परतला.परंतु, अनेकदा दरवाजा ठोठावूनही खुर्शीदा दार उघडत नव्हती. अखेर खुर्शीदाने दरवाजा उघडल्यानंतर त्याला घरात आणखी एक व्यक्ती दिसला, जो लगेच पळून गेला. या व्यक्तीबाबत आरोपीने खुर्शीदाला जाब विचारला. परंतु, तिने त्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांच्यात मोठा वाद झाला. रागाच्या भरात आरोपीने खुर्शीदाला ओढणीने गळा आवळून हत्या केली.
पुढे, आरोपीने खुर्शीदाला दफन करण्याची प्लान बनवला. परतु, त्यासाठी त्याला मृत्यू प्रमाणपत्राची आवश्यकता होती. आरोपीने अनेक स्थानिक डॉक्टरांशी संपर्क साधला. परंतु, कोणीही मृत्यू प्रमाणपत्र देण्यास तयार झाले नाही. हताश होऊन त्याने जवळच्या नवजीवन परिसरात राहणाऱ्या त्याच्या भावाची भेट घेतली आणि घडलेला संपूर्ण प्रकार त्याला सांगितला. त्यानंतर दोघांनी खुर्शीदाचा मृतदेह घरातील फ्रिजमध्ये ठेवला आणि खोटे मृत प्रमाणपत्र बनवून देईल, अशा डॉक्टराचा शोध सुरू केला.
आरोपीच्या हालचालींवर शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी याबाबत पेल्हार पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलीस आरोपीच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांना खुर्शीदाचा मृतदेह फ्रिजमध्ये आढळून आला. आरोपीला ताबडतोब अटक करण्यात आली आणि खुर्शीदाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली.
मुलीची काळजी न घेतल्याच्या कारणावरून पत्नी हत्या केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली. ठाणे पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी शैलेश साळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विक्की बबन लोंडे याने ८ ऑक्टोबर रोजी अंबरनाथ परिसरातील राहत्या घरी पत्नी रुपाली विक्की लोंदे (वय, २६) हिचा गळा आवळून खून केला.