Jalna News: जालन्यातील वाटुर फाटा येथे एका तरुणाने स्वत:ला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावातील व्यापाऱ्यासोबत पैशाच्या वादातून त्याने स्वत: पेटवून घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
प्रल्हाद भगस असे स्वत:ला पेटवून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हादने शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमरास जालन्यातील वाटुर फाटा येथे स्वत:ला पेटवून घेतले. यानंतर घटनास्थळी असलेल्या काही तरुणांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. या तरुणांनी त्याला जखमी अवस्थेत प्रल्हादला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
जालन्यातील एका खाजगी रुग्णालयात प्रल्हादवर उपचार सुरू आहेत. या घटनेत प्रल्हाद ५० टक्के भाजल्याचे सांगण्यात आले. गावातील व्यापाऱ्यासोबत झालेल्या पैशाच्या वादातून प्रल्हादने स्वत:ला पेटवून घेतल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
संबंधित बातम्या