Pune Crime News : पुण्यातील राम टेकडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसी बोलत नसल्याने व तिने ब्रेकअप केल्याने रागाच्या भरात एकाने तिच्या दोन गाड्यांवर पेट्रोल ओतून त्या पेटवून दिल्या आहेत. ही घटना पुण्यातील रामवाडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमजद पठाण असे आरोपीचे नाव आहे. अमजद हा वानवडी परिसरात राहत असून तो एका सुरक्षा एजन्सीमध्ये बॉडीगार्ड म्हणून काम करतो. पीडित महिला देखील याच एजन्सीमध्ये बॉडीगार्ड म्हणून काम करते. एकाच ठिकाणी काम करत असल्याने दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले होते. दरम्यान, काही दिवस रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा आला. त्यामुळे महिलेनं आरोपी अमजदशी बोलणे बंद केले. या रागातून त्याने हे कृत्य केले.
ब्रेकअप केल्याने अमजद (वय ४०) हा त्याच्या प्रेयसीवर चिडला होता. त्यांच्या नात्यात दुरावा आल्यावर प्रेयसीने त्याच्यापासून दुरावा ठेवला होता. पुढे तिचे लग्न झाले. मात्र, तरी सुद्धा अमजद हा तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. बुधवारी ती आपल्या पती सोबत एका लग्नाला गेली होती. त्यांच्या मागोमाग अहमद पठाण देखील गेला. तेव्हा त्याचा तिच्या पतीबरोबर वाद झाला. यामुळे तिने अमजदला भेटायला नकार दिला. या गोष्टीचा अमजदला राग आला. त्याने गुरुवारी पहाटे ५ वाजता प्रेयसी राहत असलेल्या सोसायटीत गेला. या ठिकाणी त्याने तिच्या व तिच्या पतीच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून त्या पेटवून दिल्या. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अहमद पठाण याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित अदमाने करत आहेत.
पुण्यात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. दिवसेंदिवस किरकोळ कारणावरून वाद होत आहे. याच वादातून खून, हत्या या सारख्या घटना देखील वाढल्या आहेत. या वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी रूट मार्च करत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे.
संबंधित बातम्या