भाचीनं पळून जाऊन लग्न केलं, नाव खराब झाल्यामुळं संतापलेल्या मामानं रिसेप्शनच्या जेवणात विष मिसळलं! कोल्हापूर हादरलं!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भाचीनं पळून जाऊन लग्न केलं, नाव खराब झाल्यामुळं संतापलेल्या मामानं रिसेप्शनच्या जेवणात विष मिसळलं! कोल्हापूर हादरलं!

भाचीनं पळून जाऊन लग्न केलं, नाव खराब झाल्यामुळं संतापलेल्या मामानं रिसेप्शनच्या जेवणात विष मिसळलं! कोल्हापूर हादरलं!

Jan 08, 2025 12:02 PM IST

Kolhapur Panhala News : कोल्हापुरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाचीने पळून जाऊन गावातील एका मुलीशी लग्न केल्याने बदनामी होईल या भीतीने थेट लग्नाच्या जेवणात विष मिसळलं.

 पळून जाऊन भाचीने गावातील मुलाशी लग्न केलं, बदनामीच्या भीतीने लग्नाच्या जेवणात मामाने विष मिसळलं, कोल्हापूर हादरलं
पळून जाऊन भाचीने गावातील मुलाशी लग्न केलं, बदनामीच्या भीतीने लग्नाच्या जेवणात मामाने विष मिसळलं, कोल्हापूर हादरलं

Kolhapur News : कोल्हापुरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाचीने पळून जाऊन गावातील एका मुलीशी लग्न केल्याने बदनामी होईल या भीतीने थेट लग्नाच्या जेवणात विष मिसळलं. ही घटना आचाऱ्याचा लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर आरोपी मामा फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी मामाचा शोध घेतला जात आहे. ही घटना पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश ज्योतीराम पाटील असं आरोपी मामाचे नाव आहे.

काय आहे प्रकार ?

महेश पाटील याची भाची ही त्याच्या कडे राहणाऱ्यास आली होती. तिचे गावातील एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान, दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या प्रियकराने मामाकडे जात लग्नाची मागणी केली होती. मात्र, मामाने या लग्नाला विरोध करत लग्नास परवानगी नाकारली. यामुळे भाचीने व तिच्या प्रियकराणे पळून जाऊल लग्न केलं. या घटनेमुळे मामा चांगलाच संतापला होता. भाचीने पळून जाऊन लग्न केल्याने गावात आपली बदनामी झाली, याचा राग मामाला आलेला. यामुळे त्याने भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणामध्ये विष मिसळले. जेवणात विष मिसळताना मामाला आचाऱ्याने पाहिले. त्याने त्याला हटकले व पकडण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये झटापट झाली. यानंतर मामाने आचाऱ्याला धक्का देऊन पळ काढला. ही बाब त्याने भाचीच्या नवऱ्याला सांगितली. यामुले लग्न मंडपात गदारोळ झाला.

भाचीची गावातून मिरवणूक

भाची प्रियकरासोबत पळून गेल्यावर दोघांचे प्रियकराच्या घरच्यांनी लग्न लावून दिले. यानंतर सासरच्या कुटुंबीयांनी मंगळवारी गावात दोघांची वरात काढली. यानंतर गावातील एका हॉलमध्ये रिसेप्शनचा कार्यक्रम देखील ठेवला होता. गावातील अनेक पाहुणे या कार्यक्रमाला दोघांना आशीर्वाद देण्यासाठी आले होते. त्यांच्या जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी ११.१५ च्या दरम्यान, आरोपी मामाने विषारी औषधाची बाटली घेऊन रिसेप्शन हॉलमध्ये घुसला.

सभा मंडपात गोंधळ

मामाने जेवणात हे विषारी औषध मिसळायला सुरुवात केली. ही बाब आचाऱ्याने पाहिली व त्याने याला विरोध केला. अन्नात विषारी औषध मिसळल्याची माहिती हॉलमध्ये समजात मोठा गोंधळ उडाला. या नंतर नवरदेव व मुलाचे काका संजय पाटील यांनी थेट पन्हाळा पोलीस ठाणे गाठले. व आरोपी मामाविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अन्नाचे नमुने ताब्यात घेतले आहे. तसेच आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर