Man stab in Thane: सध्या पावसाचा हंगाम सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथे जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचे पाणी रस्तावर आणि खड्ड्यांमद्धे साचले आहे. ठाण्यात देखील मोठा पाऊस झाला असून रस्त्यावर पाणी साचले आहे. या पाण्यातून मार्ग काढतांना नागरिकांची दमछाक होत असतांना अंगावर पाणी उडत असल्याने वादाचे प्रसंग देखील उद्भवत आहेत. अशीच एक घटना ठाण्यातील कासारवाडवली येथील घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथे घडली. एका बुलेट चालकाने अंगावर रस्त्यावरील पाणी उडल्याच्या कारणावरून रिक्षा चालकाला चाकूने भोसकले. किरकोळ कारणातून झालेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेले माहितीनुसार, रिक्षाचालक शाकीर रसुल शेख (वय ३३ ) असे जखमीचे नाव आहे. ठाण्यातील कासारवडवली येथे पावसाचे पाणी रस्त्यावर साचले आहे. या रस्त्याने रिक्षा घेऊन जात असतांना रिक्षाचे चाक खड्ड्यात आदळून त्यातील पाणी बाजूने जाणाऱ्या बुलेट चालकाच्या अंगावर उडाले. या घटनेचा राग आल्याने बुलेटस्वाराने रिक्षा चालकाला थांबावले. यानंतर त्याने रिक्षाचालक शाकीर रसुल शेख याला मारहाण केली. प्रवासी सोडून आल्यावर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादात आरोपीने रिक्षाचालक शेख याच्या पोटात चाकू खुपसला. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात आरोपी शाहबाज उर्फ नानू खान याच्या विरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
रिक्षा चालक शाकीर रसुल शेख याने शुक्रवारी ठाणे स्टेशनवरून ठाण्यातील उन्नती ग्रीन्स, आनंदनगर, कासारवडवली, जी.बी.रोड येथे प्रवासी घेऊन जात होता. यावेळी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास रिक्षा खड्ड्यात गेल्याने बुलेट चालक आरोपी शाहबाज उर्फ नानू खान याच्या अंगावर खड्ड्यातील पाणी उडाले. यावेळी त्याने रिक्षा गाठून मध्येच थांबवून रिक्षा चालक तक्रारदार शाकीर शेख याला मारहाण केली. रिक्षाचालक भाडे सोडून पुन्हा घोडबंदर रोडवर आला. यावेळी आरोपीने पुन्हा त्याला अडवले. यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. शाहबाजने शाकीर शेख याच्या पोटात चाकू भोसकून घटनास्थळांवरून दुचाकी घेऊन फरार झाला. यानंतर शेख याला दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याने शनिवारी कासारवडवली पोलीस ठाण्यात जात आरोपी शाहबाज उर्फ नानू खान याच्या विरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या