मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pimpri Chinchwad murder : भावा विरोधात तक्रार दिल्याने पत्नीचा खून करत मृतदेह जमिनीत पुरला; पतीसह जावेला अटक, दीर फरार

Pimpri Chinchwad murder : भावा विरोधात तक्रार दिल्याने पत्नीचा खून करत मृतदेह जमिनीत पुरला; पतीसह जावेला अटक, दीर फरार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 21, 2024 07:54 AM IST

Pimpri Chinchwad murder : पिंपरीचिंचवड येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भावाविरोधात पोलिसांत तक्रार दिल्याने पतीने, भाऊ आणि जावे सोबत पत्नीची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

husband murderd wife in Pimpri Chinchwad
husband murderd wife in Pimpri Chinchwad

Pimpri Chinchwad murder : उद्योगनगरी पिंपरीचिंचवड येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तीन वर्षांपूर्वी दिराला एका प्रकरणात पोलिसांना पकडून दिल्याच्या रागातून पतीने भाऊ आणि जावे सोबत मिळून आपल्या पत्नीच्या खून करून तिचा मृतदेह हा जमिनीत पुरला. या खुनाचा पोलिसांनी भंडाफोड केला असून पतीसह जावेला अटक करण्यात आली आहे. तर दीर फरार झाला आहे. ही घटना १६ जानेवारी रोजी घडली.

Maharashtra Weather Update : देशात काही ठिकाणी शीतलहर तर कुठे पावसाचा अंदाज! महाराष्ट्रात असे असेल हवामान

सुनंदा लक्ष्मण चव्हाण (वय २७, रा. पाचाणे, ता. मावळ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पती लक्ष्मण रामभाऊ चव्हाण (वय ३२) आणि जाऊ नंदा गणेश चव्हाण या दोघांना अटक करण्यात आली असून दीर गणेश उर्फ लहू रामभाऊ चव्हाण (रा. पाचाणे, मावळ) हा फरार झाला आहे. या प्रकरणी सुनंदा यांचा भाऊ शाम नामदेव चव्हाण (वय २८, रा. केळवडे, ता. भोर ) यांनी शिरगाव-परंदवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

CM Eknath Shinde : राम मंदिराच्या भव्य सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार नाहीत; ट्विट करत सांगितलं कारण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद येथे एका गुन्ह्यात सुनंदा हिने तिचा दीर गणेश याला पोलिसांकडे पकडून दिले होते. पोलिसांनी दीर गणेश चव्हाणला अटक केली होती. त्याला कारागृहात टाकण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांत दिल्याने गणेश चव्हाणला वहिनीचा सूड घ्यायचा होता. तर भावाला पोलिसांना दिल्याने पतीलाही पत्नीवर राग होता.

याच रागातून आरोपींनी सुनंदाचा खून करण्याचा कट रचला. आरोपींनी सुनंदा हीचा १६ जानेवारी रोजी सकाळी दगडाने ठेचून खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह चांदखेड येथील डोंगरावर पुरला. सुनंदाचा हीचा फोन लागत नसल्याने तिच्या माहेरच्या मंडळींनी पोलिसांत तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी सासरच्यांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी उदवाउडवीची उत्तरे दिल्याने हा प्रकार उघडकीस आला.

WhatsApp channel