Pune Hadapasar Murder : प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्याने गावाहून प्रेयसीसह पळून आलेल्या एका प्रियकराने टोकाचे पाऊल गाठले. आधी प्रेयसीची गळा आवळून हत्या केली तर त्यानंतर स्वत: पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. दरम्यान, या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.
मोनिका कैलास खंडारे (वय २४) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर प्रियकर आकाश अरुण खंडारे (वय ३०) असे आरोपी व आत्महत्या केलेल्या प्रियकराचे नाव आहे. हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोनिका खंडारे आणि आकाश खंडारे हे नातेवाईक आहेत. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, त्यांच्या नात्याला त्यांच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे ते घरून पळून पुण्यात आले होते. गेल्या काही दिवसा पासून ते हडपसर परिसरातील मांजरी-मुंढवा रस्त्यावरील स्पॉटलाइट हॉटेलमध्ये राहत होते. दरम्यान, घरच्यांचा विरोध कायम असल्याने आकाशने १३ मे रोजी मध्यरात्री मोनिकाचा चादरीने गळा आवळून तिची हत्या केली. तर त्यानंतर त्याने देखील खोलीतील पंख्याला चादर बांधून गळफास घेऊन जीवन संपवले. दोघेजण दार उघडत नअसल्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी याची माहिती हॉटेलच्या मेनेजर दिली. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांना बोलावून दुसऱ्या चावीने त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला असता, मोनिका ही बेडवर तर आकाशने गळफास घेतल्याचे दिसून आले. सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी राख, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उमेश गिते यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिस थेट दोघांच्या कुटुंबीया पर्यंत पोहोचले. यावेळी दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे पुढे आले. मोनिका व आकाशचे प्रेमसंबंध होते. मात्र, त्यांच्या प्रेमसंबंधाला घरच्यांनी विरोध केल्याने दोघेजण पळून आले होते.
मोनिका व आकाश मूळचे अकोला जिल्ह्यातील आहेत. त्यांचे मूळ गाव हे बाळापूर तालुक्यातील कसुरा आहे. दोघेही नातेवाईक आहेत. त्यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, त्यांच्या या प्रेमसंबधाला कुटुंबीयांचा विरोध होता. आकाश शेती करीत होता, तर मोनिका ही नोकरी करीत होती. मात्र, घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केल्याने त्यांनी या पूर्वी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असे तपसात पुढे आले आहे.
संबंधित बातम्या