Brother killed his own brother in kalyan for 500 rupees : कल्याण येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. फक्त पाचशे रुपयासाठी भावानेच भावाची हत्या केल्याचं उघड झालं आहे. येथील रोहिदास वाडा परिसरामध्ये ही घटना घडली आहे. सख्ख्या भावाने पाचशे रुपये घेतल्याच्या रागातून भावाची धारदार शास्त्राने हत्या केली. नईम शमीम खान असं हत्या करण्यात आलेल्या भावाचे नाव आहे. तर सलीम शमीम खान असं आरोपी भावाचं नाव आहे.
कल्याण पश्चिममधील रोहिदासवाडा परिसरात खान कुटुंब राहण्यास आहे. आईसह तिघे भाऊ खान कुटुंबियात राहतात. मोठा भाऊ आरोपी सलीम शमीम खान, हत्या झालेला नईम शमीम खान आणि त्याचा एक भाऊ असे चौघे जण घरी राहत होते. बुधवारी रात्री सलीम याचे पाचशे रुपये नईमने घेतल्याचा संशय सलिमला संशय होता. यावरुण त्यांच्यावर मोठा वाद झाला. या वादाच्या व रागाच्या भरात सलीमने नईम याच्यावर घरातील स्वयंपाकासाठी वापरणाऱ्या धारदार चाकूने करत नईमची हत्या केली. या घटनेनंतर सलीम फरार झाला.आहे.
मंगळवारी रात्री झोपताना सलीमच्या खिशातून ५०० रुपये हे गायब झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या खिशात पैसे नव्हते. त्यामुळे त्याने घरच्यांना खिशातील पैसे कुणी घेतले असे विचारले. मात्र, पैसे कुणी घेतले हे कुणीच सांगितलं नाही. मात्र, लहान भाऊ नईम याने पैसे घेतले असल्याचा संशय हा सलीमला होता. यामुळे त्याने पैसे घेतले का असा जाब नईमला विचारला. यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत आरोपी मोठा भाऊ व सलीम रक्ताचं नातं विसरला. त्याने घरातील चाकूने सख्ख्या भावावर वार करत नईमखान याची हत्या केली.
या घटनेत नईम हा गंभीर जखमी झाला होता. भावाची हत्या केल्यानंतर सलीम घरातून फरार झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटणास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हत्येसह विविध कलमांतर्गत सलीमवर गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी आरोपीला १२ तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या. या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून त्यांनी घटनेचा पंचनामा करत गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित बातम्या