Karnataka Crime news : कर्नाटकातील तुमकुरू येथे एका व्यक्तीने पत्नीचा गळा चिरून खून केला. यानंतर पत्नीची कातडी सोलून रात्रभर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पत्नीने रात्रीचे जेवण देण्यास नकार दिल्याने रागाच्या भारत त्याने पत्नीची हत्या केल्याचे कबूल केले आहे. घरातील स्वयंपाकघरात आरोपीने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे लपवले होते. आरोपी पती हा पत्नी आणि ८ वर्षाच्या मुलासह राहत होता. दोघांचेही सुमारे १० वर्षांपूर्वी लग्न झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा (वय३५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर शिवराम असे आरोपी पतीचे नाव आहे. शिवराम हा एका मिलमध्ये कामाला होता. सोमवारी सायंकाळी कामावरून घरी आल्यावर त्याने पत्नी पुष्पाला जेवण मागितले. मात्र, तिने जेवण बनवले नाही असे सांगत जेवण देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने दोघांत जोरदार भांडण झाले. यात रागाच्या भरात शिवरामने संतापून पुष्पाची चाकूने भोसकून हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवराम आणि पुष्पामध्ये वारंवार भांडणे होत होती. सोमवारीही त्यांच्यात वाद झाला असता पुष्पाने जेवण देण्यास नकार दिला. त्यामुळे शिवरामचा राग आणखी वाढला. त्याने धारदार चाकूने पुष्पार वार केले. यानंतर तिचा गळा कापण्यात आला. एवढेच नाही तर पत्नीची कातडी त्याने सोलून रात्रभर मृतदेहाचे तुकडे केले.
शिवरामने पुष्पाचा खून करून तिच्या संपूर्ण शरीराची कातडी सोलली. यानंतर रात्रभर तिच्या मृतदेहांचे तुकडे केले. पुष्पा आणि शिवराम भाड्याच्या घरात राहत होते. हा खून केल्यानंतर शिवरामने सकाळी घरमालकाला याची माहिती दिली. यानंतर लोक घटनास्थळी पोहोचले असता त्यांना अनेक तुकडे केलेल्या पुष्पाचा मृतदेह दिसला. यामुळे शेजारी देखील हादरले. दारमहान, त्यांची दोन्ही मुले झोपली होती. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणी तुमकुरुचे एसपी अशोक व्यंकट यांनी सांगितले की, शिवरामने पत्नीच्या हत्येची कबुली दिली आहे. यापूर्वीही दोघांमध्ये वाद होत होते. घटनेच्या दिवशी शिवरामचा नोकरीवरून वाद झाला होता. यानंतर त्याने पत्नीची हत्या केली. तसेच घर मालकाला आणि त्याच्या कामाच्या ठिकाणावरील बॉसला याची माहिती दिली. एसपी म्हणाले की, आम्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून, त्यावरून आणखी काही माहिती मिळेल.
संबंधित बातम्या