बहिणीला नेलं म्हणून संतापला दाजी; दुकानात घुसून मेव्हण्यावर कोयत्याने वार करत कापली मान, दौंडमधील घटना-man killed his brother in law by stabbing with koyata in daund ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बहिणीला नेलं म्हणून संतापला दाजी; दुकानात घुसून मेव्हण्यावर कोयत्याने वार करत कापली मान, दौंडमधील घटना

बहिणीला नेलं म्हणून संतापला दाजी; दुकानात घुसून मेव्हण्यावर कोयत्याने वार करत कापली मान, दौंडमधील घटना

Aug 03, 2024 11:25 PM IST

Pune Crime : दाजीने मेव्हण्याचा कोयत्याने वार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. दौंडमधील खामगाव गावातील घडामोडी चौकात ही घटना घडली आहे.

दौंडमध्ये दुकानात घुसून हत्या
दौंडमध्ये दुकानात घुसून हत्या

राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. उरण, नाशिकनंतर आता पुणे जिल्ह्यातही हत्येची घटना घडली आहे. दौंड तालुक्यातील खामगाव येथे भरचौकात असलेल्या एका दुकानदाराचा कोयत्याने सपासप वार करीत निर्घृण हत्या करण्यात आली. बहिणीच्या पतीनेच भावाची निर्घृण हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

दाजीने  मेव्हण्याचा कोयत्याने वार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. आज शनिवारी (३ ऑगस्ट) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास खामगाव गावातील घडामोडी चौकात ही घटना घडली आहे.

सुरज राहुल भुजबळ असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अमोल बहिरट असे आरोपीचे नाव आहे.

सूरजने बहिणींना घरी आणले म्हणून चिडलेल्या दाजीने अमोल बहिरट याने त्याचा खून केला. वर्दळीच्या चौकात असलेल्या दुकानात घुसून आरोपीने सूरजवर कोयत्याने १५ ते १६वार केले. त्याने मानेसह, पायावर व पोटावर वार केले. या हल्ल्यात सूरजची मान कापली गेली व तो जागीच गतप्राण झाला. हत्येचा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास करत आहेत.

गेल्या आठवड्यात नवी मुंबईतील उरण येथे यशश्री शिंदे या २० वर्षीय तरुणीची एकतर्फी प्रेमातून दाऊद शेख नामक आरोपीने क्रूरपणे हत्या केली. त्याच्या आधी शहापूरमध्ये अक्षता म्हात्रे या महिलेवर ३ पुजाऱ्यांनी बलात्कार करुन तिला संपवलं होती. ही महिला घरातून रुसून मंदिरात जाऊन बसली होती. या घटनांनी राज्यात खळबळ माजली असतानाच आता दौंडमधील घटनेची भर पडली आहे.

यशश्रीने दाऊदच्या नावाचा काढला होता टॅटू!

संपूर्ण राज्यात खळबळ माजवलेल्या उरण हत्याकांडामध्ये एक मोठा ट्विस्ट आला आहे. पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये मृत यशश्री हिच्या शरीरावर दोन टॅटू आढळले होते. त्यातील एका टॅटूमध्ये आरोपी दाऊद शेखचे नाव लिहिले होते. मिळालेल्या माहितीनुसार यशश्रीने हा टॅटू यावर्षी फेब्रुवारी महिन्यात काढला होता तसेच हा टॅटू काढताना दाऊद शेखही तिच्यासोबत होता. दाऊद शेखने जबरदस्तीने तिला टॅटू काढायला लावले की, तिने आपल्या मर्जीने शरीरावर गोंदवून घेतले, याचा शोध घेण्यासाठी पोलिस टॅटू आर्टिस्टला शोधत आहेत.

 

विभाग