Salman Khan : सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला वांद्रे येथून अटक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Salman Khan : सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला वांद्रे येथून अटक

Salman Khan : सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला वांद्रे येथून अटक

Oct 31, 2024 08:28 AM IST

Salman Khan death threat News: सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला वांद्रे येथून अटक करण्यात आली आहे.

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला वांद्रे येथून अटक
सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला वांद्रे येथून अटक

Salman Khan News: दोन कोटी रुपये न दिल्यास बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना पाठवणाऱ्या एका ५६ वर्षीय व्यक्तीला बुधवारी अटक करण्यात आली.

आझम मोहम्मद मुस्तफा या व्यक्तीने मंगळवारी वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन क्रमांकावर धमकीचा मेसेज पाठवून सलमान खान आणि जीशान सिद्दीकी या दोघांचेही माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्यासारखीच अवस्था होईल, असे म्हटले आहे. बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी वांद्रे परिसरात तीन दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. हा मेसेज मिळाल्यानंतर वरळी पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

वांद्रे (पश्चिम) येथील ब्लू फेम अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मुस्तफा याला बुधवारी अटक करण्यात आली आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाइल फोन आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांनी ज्या मोबाईल नंबरवरून मेसेज पाठवण्यात आला. त्या नंबरचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) गोळा केला आणि या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एक पथक तयार केले. तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांनी आरोपीला वांद्रे येथून अटक केली. मुस्तफाने वाहतूक पोलिसांना दिलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, सलमान खान आणि झिशान सिद्दीकी यांनी दोन कोटी रुपये न दिल्यास त्यांची अवस्थ बाबा सिद्दीकींसारखीच होतील. या धमकीला विनोद समजू नये किंवा हलक्यात घेऊ नये.'

सलमान खानच्या सुरक्षतेत वाढ

या महिन्याच्या सुरुवातीला मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन डेस्कवर अभिनेत्याकडून पाच कोटी रुपयांची मागणी करणारा धमकीचा मेसेज आला होता. धमकीच्या मेसेजप्रकरणी पोलिसांनी झारखंडमधील जमशेदपूर येथून एका व्यक्तीला अटक केली होती. खान यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशातील नोएडा येथून अटक केली असून राष्ट्रवादीचे नेते जीशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची वांद्रे (पूर्व) येथे १२ ऑक्टोबर रोजी तीन बंदुकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. विशेष म्हणजे खान यांना यापूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. या टोळीतील संशयित सदस्यांनी यावर्षी एप्रिलमध्ये अभिनेत्याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार केला होता. काही महिन्यांपूर्वी नवी मुंबई पोलिसांनी बिश्नोई टोळीने खानच्या हत्येचा कट रचल्याचा पर्दाफाश केला होता, त्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर