Mumbai Kurla Crime : महिलेने वेळेवर नाश्ता तयार केला नाही म्हणून तिच्या पतीने तिच्या डोक्यात हातोडा मारल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या कुर्ला परिसरात गुरूवारी घडली. पती ऐवढ्यावरच नाही थांबला तर त्याने पत्नीला चाकू आणि स्कू ड्रायव्हरने देखील तिला मारहाण केली. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या नातेवाइकांनी तिला तातडीने भा.भा. रुगणालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपी पाटीवर गुन्हा दाखल केला आहे.
गुडिया मोहम्मद फय्युम खान (वय ३४) असे पतीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. फय्युम जहीर खान (वय ३८) असे आरोपी पतीचे नाव आहे. दोघेही कुर्ला पोलीस ठाण्याच्या पाठीमागे असलेल्या गणेश बाग लेन येथे राहत होते. दरम्यान, गुरूवारी गुडिया हिने पतीसाठी वेळेत नाश्ता बनवला नाही. या कारणावरून आरोपी पती फय्युमने गुडियाशी वाद घालण्यास सुरुवात केली. यात राग अनावर झाल्याने संतापलेल्या फय्युमने घरातील शिलाई मशीनच्या शेजारी असलेला हातोड्याने गुडिया हीच्या डोक्यावर मारहाण केली.
आरोपी पती ऐवढ्यावरच थांबला नाही तर त्याने घरातील चाकूने पत्नी गुडिया हीच्या गळ्यावर वार केले. यानंतर त्याने घरातील स्क्रू डायवरने तिच्या डोक्यावर मारहाण केली. यात पत्नी गुडिया ही गंभीर जखमी झाली. तिच्या नातेवाइकांनी तिची आरोपी पतीच्या तावडीतून सुटका करून गंभीर जखमी झालेल्या गुडिया हिला तात्काळ कुर्ला येथील भा.भा. रुग्णालयात दाखल केले.
सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर पोलिसांनी गुडिया खान हीचा जबाब नोंदवला. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी हत्येच्या प्रयत्न व धमकावल्याप्रकरणी फय्युम खान विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
संबंधित बातम्या