Man Held For Raping Woman Bank Employee: नवी मुंबईत एका ४१ वर्षीय बँक कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पनवेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेतील संबंधित तरतुदींनुसार आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आली.
बँकेत ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या आरोपीने काही महिन्यांपूर्वी पीडितेशी मैत्री करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच पीडित महिलेच्या संमतीशिवाय आरोपीने तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केले, ज्याचा वापर महिलेला घमकावण्यासाठी केला, अशी महिती एका अधिकऱ्याने दिली.
आरोपीने महिलेचे अश्लील व्हिडिओ तिच्या नातेवाईकांना आणि बँकेतील सहकारी कर्मचाऱ्यांना दाखवण्याची धमकी देत अनेकदा तिच्यावर अत्याचार केले. महिलेने त्याला विरोध करण्यास सुरुवात केली असता आरोपीने तिला शिवीगाळ आणि मारहाण केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पुण्याबाहेरील ग्रामीण भागात १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला अटक करण्यात आली आहे. शनिवारी शाळेत 'गुड टच, बॅड टच' सत्रादरम्यान विद्यार्थिनीने हा प्रकार उघडकीस आला. अधिकाऱ्यांनी तिच्या पालकांना याची माहिती दिली, त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामुळे त्या व्यक्तीला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने काही दिवसांपूर्वी मुलीला चॉकलेट देऊन जवळ जाण्याचा प्रयत्न करत शाळेत जात असताना अडवले होते. शुक्रवारी ती शाळेतून परतत असताना त्याने तिला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.पुढील तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. आरोपीवर बीएनएस आणि पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
वैद्यकीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील सहाय्यक प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. त्यांना शनिवारी निलंबित करण्यात आले असून पालिका या घटनेची चौकशी करत आहे. या चौकशी समितीच्या निष्कर्षानुसार कारवाई केली जाईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहे.