Mumbai News: मुंबई पोलीस भरती परीक्षेत फसवणूक केल्याच्या आरोपाखाली ओशिवरा पोलिसांनी एका २५ वर्षीय तरुणाला अटक केली, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. पोलिस विभागात चालकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेदरम्यान आरोपीला ब्लूटूथचा वापर करताना रंगेहाथ पकडले.ओशिवरा येथील रायगड मिलिटरी स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान आरोपी सतत कानाला हात लावत असल्याने पर्यवेक्षकाने आरोपीच्या वर्तनावर संशय आला. यानंतर परीक्षकांनी त्याची तपासणी केली असता हा धक्कादायक प्रकार उघड झाला.
मुंबई पोलीस दलातील चालक, कारागृह अशा पदासाठी आज मुंबईतील अनेक केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात आली. राज्यभरातून परीक्षेसाठी हजारो विद्यार्थी मुंबईत विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा देत होते.चालक आणि कारागृह अशा दोन्ही पदांसाठी काल मुबईच्या विविध परीक्षा केंद्रावर परीक्षा पार पडल्या. मात्र, ओशिवरा येथील रायगड मिलिटरी स्कूलमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेला एका तरूण मुन्नाभाई स्टाइलने कॉपी करताना आढळून आळा.
संबंधित तरुणाने उत्तरे मिळविण्यासाठी आरोपीने कानात ब्लूटूथ लपवला होता. मात्र, तो वारंवार आपल्या कानाला स्पर्श करत असल्याने पर्यवेक्षकाला संशय आला. त्यानंतर पर्यवेक्षकाने पाहणी केली असता आरोपीच्या कानात खोलवर घुसवलेल्या सिमकार्डला जोडलेले एक छोटेसे ब्लूटूथ डिव्हाइस आढळलेनसेटअप असूनही खराब नेटवर्क रिसेप्शनमुळे आरोपींना अडथळा निर्माण झाला. सिग्नल सुधारण्यासाठी त्यांनी स्वच्छतागृहातही भेट दिली, पण त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. संपूर्ण परीक्षेत कोणीतरी त्याला उत्तरे लिहून देत असल्याचे पोलिसांनी उघड केले.
पोलीस खात्यामध्ये दाखल होऊन भविष्यात कायद्याचे रक्षक बनू पाहणाऱ्या भावी पोलिसच कॉपी करताना आढळून आल्याने संबंधित केंद्रावर खळबळ माजली. त्याच्याविरुद्ध फसवणूक तसेच महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियम १९८२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस विभागात चालकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी विविध केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात आली. पोलीस भरतीत अनुचित प्रकार घडू नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी डोळ्यात तेल घालून होते. परीक्षेत कुणीही कॉपी करु नये म्हणून दक्षता घेण्यात आली. मात्र, परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी काही तरुण मुन्नाभाई स्टाइलने कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, असे प्रयत्न अनेकांच्या अंगलट आले आहे. एवढेच नव्हेतर, अशा कृत्यांमुळे एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते.
संबंधित बातम्या