Worli Tree Fall : मुंबईच्या वरळी परिसरात झाड अंगावर कोसळल्यानं पादचाऱ्याचा मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Worli Tree Fall : मुंबईच्या वरळी परिसरात झाड अंगावर कोसळल्यानं पादचाऱ्याचा मृत्यू

Worli Tree Fall : मुंबईच्या वरळी परिसरात झाड अंगावर कोसळल्यानं पादचाऱ्याचा मृत्यू

Jul 02, 2024 10:45 AM IST

Man Died in Worli due to Tree Fall : मुंबईत वरळी परिसरात झाड अंगावर पडल्याने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजता घडली.

मुंबईच्या वरळी परिसरात झाड अंगावर कोसळल्यानं पादचाऱ्याचा मृत्यू
मुंबईच्या वरळी परिसरात झाड अंगावर कोसळल्यानं पादचाऱ्याचा मृत्यू

Man Died in Worli due to Tree Fall : मुंबईत वरळी परिसरात झाड अंगावर पडल्याने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजता घडली. या घटनेत अंगावर झाड पडलेला व्यक्ति गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतांना संध्याकाळी ५ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार अमित जगताप असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. अमित जगताप हे सकाळी ९.३० च्या सुमारास जांबोरी मैदान गल्लीत एका चाळी जवळून जात होते. यावेळी त्यांच्या अंगावर अचानक एक झाड कोसळले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. रस्त्यावरील नागरिकांनी जगताप यांना तातडीने रिक्षातून दवाखान्यात भरती केले. तसेच या घटनेची माहिती ही मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना देखील देण्यात आली. रस्तावर झाड कोसल्याने येथे वाहतूक कोंडी झाली होती. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येऊन कोसळलेल्या झाडाचे तुकडे रस्त्याच्या बाजूला केले. यानंतर येथील वाहतूक पूर्ववत झाली.

अमित जगताप यांना तातडीने रुग्णालयात नेले. त्यांच्यावर दिवसभर उपचार सुरू होते. मात्र, गंभीर जखमी झाल्याने सायंकाळी ५.४० वाजता त्यांचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला.

धोकादायक झाडे तोडण्याची मागणी

मुंबईत अनेक उपनगरामध्ये रस्त्यावर झाडे वाढली आहे. ही झाडे धोकादायक झाली आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने या झाडांच्या फांद्या कोसळत आहेत. ही झाडे रस्त्यावर कोसळत असल्याने रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याआधी धोकादायक पद्धतीने वाढलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यात याव्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर