पुण्यात ऐन दिवाळीत हिट अँड रनची घटना समोर आली आहे.दिवाळीमध्ये रस्त्यावर दिवाळीचे फटाके उडवताना भरधाव कारने तरुणाला उडवले. पिंपरी चिंचवडमध्ये हा अपघात झाला. रावेत परिसरात रस्त्यावर फटाके उडवणाऱ्या एका ३५ वर्षांच्या तरुणाला भरधाव कारने उडवले यात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सीसीटीव्हीमध्ये हा भयावह अपघात कैद झाला आहे.
पिंपरी चिंचवडमधील रावेत येथील सेलेस्टियल सिटी सोसायटी समोर हा अपघात झाला. सोहम पटेल असे मृत तरुणाचे नाव आहे. सोहम आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करत होता. कुटुंबासह दिवाळी साजरी करत होता. रस्त्यावर फटाके उडवत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने त्याला उडवलं. त्यावेळी अन्य लोकही तेथे होते. कार इतक्य वेगात निघून गेली की, काय घडलंय ते लोकांना क्षणभर कळालेच नाही. अपघातानंतर कारचालक न थांबता भरधाव वेगात निघून गेला.
भरधाव वेगातील चारचाकी वाहनाने एका ३५ वर्षाच्या तरुणाला जोरदार धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपी वाहनचालक अद्याप फरार असून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. रावेत पोलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकाला तात्काळ अटक करण्याची मागणी करत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
१ नोव्हेंबरला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास फेलिसिटी सोसायटीमधील रहिवासी रस्त्यावर फटाके उडवत होते.तेव्हा सोहम पटेलही त्यांच्यासोबत बाहेर येऊन दिवाळी साजरी करत होता. फटाका पेटवत असतानाच भरधाव वेगाने एक कार आली आणि सोहमला चिरडून त्याच वेगात निघून गेली,यात सोहमचा जागीच मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचा थरारक सीसीटीव्ही समोर आला आहे.
ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दिवाळीसारख्या आनंदाच्या सणाच्या दिवशी पटेल कुटुंबीयवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा अपघात होऊन जवळपास ४८ तास उलटल्यानंतरही आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. यामुळे रावेत परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. रावेत पोलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या वाहन चालकाला तात्काळ अटक केली नाही तर,आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा रावेत परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
ही संपूर्ण घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घरातील कर्त्या पुरुषाचा डोळ्यादेखत अपघाती मृत्यू झाल्याने सणाच्या आनंदावर विरजन पडले. आनंदाच्या दिवशीच पटेल कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अपघातानंतर ४८ तास उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाताला लागला नाही. यावरून नागिरक संताप व्यक्त करत असून आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.