मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: मुंबईत हायड्रोलिक पार्किंग कोसळून तरुणाचा मृत्यू, महिन्याभरातील दुसरी घटना

Mumbai: मुंबईत हायड्रोलिक पार्किंग कोसळून तरुणाचा मृत्यू, महिन्याभरातील दुसरी घटना

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 31, 2023 12:18 PM IST

Chembur Hydraulic car Parking Collapses: मुंबईच्या चेंबूर परिसरात हायड्रोलिक कार पार्किंग अंगावर कोसळल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Death (Representative Image)
Death (Representative Image)

Chembur Hydraulic Car Lift collapses: मुंबईच्या घाटकोपर परिसरात हायड्रोलिक पार्किंग दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू होऊन महिला उलटला नाही तोच, मुंबईच्या चेंबर परिसरात कार पार्किंग अंगावर कोसळल्याने एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या चेंबूर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश जाधव असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. योगेश हा चेंबूरच्या रस्ता क्रमांक १५वर 'स्वस्तिक प्लेअर' या दहा मजली इमारतीत सफाईचे काम करतो. या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या हायड्रोलिक कार पार्किंगचे दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी पार्किंगच्या पाईपमधून अचानक मोठ्या प्रमाणात तेलगळती सुरु झाली. ज्यामुळे हायड्रोलिकवरील दाब कमी झाला आणि हायड्रोलिक पार्किंग खाली कोसळली. योगेश त्याखाली सापडला. त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढलं. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला.

यापूर्वी घाटकोपर परिसरात याच महिन्याच्या सुरुवातीला एका २० वर्षाच्या तरुणाच्या अंगावर हायड्रोलिक पार्किंग कोसळली होती. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेला महिला उलटला नाही तोच, योगेश सोबत दुदैवी घटना घडली.

IPL_Entry_Point

विभाग