Kalyan Murder News: कल्याणमधील चिंचपाडा गावात एका पार्टीत दारूच्या तुटवड्यामुळे मित्रांनी बर्थडे बॉयला चौथ्या मजल्यावरून फेकून दिले. या घटनेत २५ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक वायाळ असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. कार्तिकने त्याचे मित्र निलेश क्षीरसागर, सागर काळे आणि धीरज यादव यांना वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावले होते.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृत कार्तिकसह निलेश, सागर आणि धीरज यांनी वाढदिवसाची पार्टी सुरू केली. परंतु, दारु कमी पडल्याने तिघेही कार्तिकला बोलू लागले. कार्तिकला अपमानित वाटले आणि त्याने नीलेशच्या डोक्यावर दारूची एक बाटली फोडली आणि तिघांना निघून जा, असे सांगितले. यामुळे त्यांच्यात वादाला उग्र वळण लागले. त्यानंतर कार्तिक त्याच्या बेडरूममध्ये गेला आणि झोपला. त्यानंतर संतापलेल्या निलेश, सागर आणि धीरज यांनी त्याच्या खोलीत गेले आणि त्याला बाल्कनीत नेऊन चौथ्या मजल्यावरून खाली फेकले. या घटनेत कार्तिकला गंभीर दुखापत झाली.
या घटनेची माहिती मिळताच कार्तिकच्या कुटुंबाने पोलिसांना कळवले. तेव्हा तिन्ही मित्रांनी एक कथा रचली आणि पोलिसांना सांगितले की, नीलेशच जखमी झाला आहे आणि कार्तिकने त्याच्या डोक्यावर बाटलीने वार केल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. आणि कार्तिक बाल्कनीतून कसा पडला, याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. कार्तिकच्या घरच्यांच्या आग्रहाखातर पोलिसांनी खोलात जाऊन वाढदिवसाच्या पार्टीतील घडामोडींचा उलगडा केला.
याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी निलेश, सागर आणि धीरज यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी परस्परविरोधी जबाब दिल्याने कार्तिकच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला आहे. या दुर्दैवी जीवितहानीमुळे घडलेल्या घटनांचा क्रम निश्चित करण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत होतो.