धोकादायक नायलॉन मांजाबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई केली आहे. विजय रमेश्वर गायकवाड (वय ३७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो वाकड येथील ज्योतिबा नगर येथील रहिवासी आहे. विजय गायकवाड हा शनिवारी त्याच्या दुकानात नायलॉनच्या मांजाची विक्री करताना सापडला.
नायलॉन मांजा विक्रीला बंदी आहे. नायलॉन मांजाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस सतर्क झाले आहेत. नायलॉन मांजापासून मानव आणि पक्षी दोघांचेही रक्षण करण्यासाठी त्यावर बंदी लागू करण्यात आली होती. आरोपी विजय गायकवाडच्या दुकानात नायलॉनच्या मांजाची विक्री होत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या दुकानावर छापा टाकला. कारवाईत पोलिसांना मोठ्या प्रमाणात नायलॉनचा मांजा आढळल्याने विजयविरोधात भारतीय दंड विधान कलम १८८, ३३६ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ५, १५ न्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात रावणकोळा गावात जुन्या वादातून दोन चुलत भावांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. महेश उत्तम सूर्यवंशी (वय,२०) आणि विकास शिवाजी सूर्यवंशी (वय, २३) असे हत्या झालेल्या चुलत भावांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आरोपी प्रकाश मुरारी सूर्यवंशी आणि त्याच्याबरोबरच्या इतर चार जणांनी धारदार शस्त्रांनी महेश आणि विकास या दोघांवर हल्ला केला. यात दोघांचाही मृत्यू झाला.