Sakinaka crime News : वाढदिवसाचा केक आणण्यास उशीर केल्याच्या कारणावरून साकीनाका परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीनं बायको व मुलावर चाकूनं हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर हल्लेखोर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
राजेंद्र शिंदे असं आरोपीचं नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकीनाका येथील अशोक नगरमधील वेल्फेअर सोसायटीच्या गल्ली क्रमांक ३ मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. आरोपी राजेंद्र याचा रविवारी वाढदिवस होता. त्याला सेलिब्रेशन करायचं होतं. मात्र, कुटुंबियांनी केक आणायल उशीर केल्यामुळं तो संतापला. त्यानं पत्नी रंजना शिंदे हिच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वडील आईला शिवीगाळ करीत असल्याचं पाहून मुलगा मध्ये पडला. त्यावेळी राजेंद्र शिंदे यांनी घरातील चाकूनं मुलाच्या मनगटावर वार केला. त्यानंतर पत्नीवरही हल्ला केला. मुलगा सोडवायला आला असता त्याच्याही पोटावर चाकू मारला.
पत्नीच्या मनगटावर तर मुलाच्या छातीवर व पोटावर वार केले. त्यात हे दोघेही जखमी झाले आहेत. जखमींना घाटकोपर पूर्वेकडील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
संबंधित बातम्या