Virar attack : विरार रेल्वे स्थानकावर थरार! पतीनं पत्नीवर केला प्राणघातक हल्ला; धारदार चाकूने कापली हाताची बोटे
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Virar attack : विरार रेल्वे स्थानकावर थरार! पतीनं पत्नीवर केला प्राणघातक हल्ला; धारदार चाकूने कापली हाताची बोटे

Virar attack : विरार रेल्वे स्थानकावर थरार! पतीनं पत्नीवर केला प्राणघातक हल्ला; धारदार चाकूने कापली हाताची बोटे

Updated Jul 03, 2024 02:37 PM IST

Husband attacks wife on Virar railway station : विरार रेल्वे स्थानकावर धक्कादायक घटना घडली आहे. एका पतीने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीवर चाकूने हल्ला केला आहे. या हल्ल्यात पत्नीच्या हाताची बोटे तुटली आहे.

विरार रेल्वे स्थानकावर थरार! पतीनं पत्नीवर केला प्राणघातक हल्ला; धारदार चाकूने कापली हाताची बोटे
विरार रेल्वे स्थानकावर थरार! पतीनं पत्नीवर केला प्राणघातक हल्ला; धारदार चाकूने कापली हाताची बोटे

Husband attack on wife on Virar railway station : विरार रेल्वे स्थानकावर आज धक्कादायक घटना घडली आहे. एका पत्नीने आपल्या पत्नीवर कौटुंबिक वादातून जीवघेणा हल्ला केला. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या हाताची बोटे देखील कापली गेली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. या घटनेनंतर स्थानकावर रक्ताचा सडा पडला होता. ही घटना रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर सकाळी ७.३० वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिव शर्मा असे आरोपी पतीचे नाव आहे. तर वीरशिला शर्मा असे पतीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. कौटुंबिक वादातून शिव शर्माने वीरशिला हिच्यावर हा जीवघेणा हल्ला केला असल्याचे तपसात उघड झाले आहे. या घटनेमुळे विरार स्थानकावर खळबळ उडाली होती.

या घटनेचे वृत्त असे की, वीरशिला शर्मा ही आज कामावर जात होती. सकाळी ७.३० वाजता ती विरार स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या पादचारी पुलावर असताना शिव शर्माने तिच्यावर चाकूने हल्ला केला. शिव शर्माने ह्याने वीरशिला हीला रेल्वे ब्रीजवर एकटे गाठून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. आधी शिवने तिच्यावर चाकूने वार केला. त्यानंतर तिचा ओढणीने गळा आवळून जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. यावेळी वीरशिला पतीचा वार हाताने अडवला. तसेच चाकूचे पाते हातात घट्ट धरुन ठेवले. यामुळे तिच्या हाताची बोटे कापली असून तिचा जीव थोडक्यात वाचला.

रेल्वे स्थानकावरील काही नागरिकांनी वीरशिला हीला संजावनी रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर तिने विरार पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी पती शिव शर्माला अटक केली आहे. शिव व वीरशिला यांच्यात गेल्या काही दिवसांनपासून भांडण सुरू होते. हे भांडण मिटविण्यासाठी मंगळवारी दोघेही विरार पोलीस ठाण्यात गेले होते. दरम्यान, पोलिसांनी दोघांना समज देऊन सोडले होते. मात्र, आज त्याने वीरशीलावर जीवघेणा हल्ला केला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर