मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Akola murder : बायकोच्या उपचारासाठी पैसे न दिल्याने नवऱ्याचा मेहुण्यांवर प्राणघातक हल्ला

Akola murder : बायकोच्या उपचारासाठी पैसे न दिल्याने नवऱ्याचा मेहुण्यांवर प्राणघातक हल्ला

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 04, 2023 04:02 PM IST

Akola patur Murder news : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आलेगाव इथे एक धक्कादायक घटना घडली आहे. बायकोच्या उपचारासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून नवऱ्याने दोन मेहुण्यांवर हल्ला केला असून यात एकाचा मृत्यू झाला आहे.

Akola murder
Akola murder

अकोला : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आलेगाव इथे नवऱ्याने बायकोच्या दोन सख्ख्या मावस भावांवर चाकुने हल्ला केला. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर दूसरा गंभीर जखमी झाला आहे. मेहुण्याने बायकोचे दवाखान्याचे बिल भरले नाही म्हणून हा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चेतन शामराव काळदाते (वय २७ रा. आलेगाव, ता. पातूर, जि. अकोला) असं खून झालेल्या तरुणाचं नावं आहे. तर महादेव प्रल्हाद धात्रक, गणेश प्रल्हाद धात्रक आणि दीपक प्रल्हाद धात्रक अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तिघां भावांनी चाकूने हल्ला करून चेतन आणि दीपक या दोघांना जखमी केले. उपचारा दरम्यान चेतनचा मृत्यू झाला. तर दीपक हा गंभीर जखमी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चान्नी पोलीस स्टेशन हद्दीत आलेगाव येथील शिवाजी चौकात दोन सख्ख्या भावावर धारदार शास्त्राने हल्ला झाला. या हल्ल्यात चेतन शामराव काळदाते आणि दीपक शामराव काळदाते हे दोघे भाऊ गंभीर झाले. त्यांना अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, काळदाते कुटुंबांयांनी चान्नी पोलिसांत दीलेल्या तक्रारीनुसार महादेव प्रल्हाद धात्रक, गणेश प्रल्हाद धात्रक आणि दीपक प्रल्हाद धात्रक यांचावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

गणेश धात्रक यांचा विवाह चेतन शामराव काळदाते (मृत) आणि दीपक शामराव काळदाते यांच्या सख्ख्या मावस बहिणी सोबत झाला होता. काही दिवसांपूर्वी गणेशची पत्नी म्हणजेच चेतनची बहीण आजारी असल्याने तिला दवाखान्यात भरती करण्यात आले होते. दरम्यान, गणेश हा बाहेरगावी गेला असल्यामुळे तिला उचारार्थ चेतन आणि दीपक काळदाते या दोघां भावांनी रुग्णालयात भरती केले. मात्र, त्यांनी दवाखान्याचे बिल दिले नाही या कारणावरून हा हल्ला करण्यात आला आहे.

IPL_Entry_Point

विभाग