Pune News: पुणे रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन महिलेसह एका पुरुषाने आत्महत्या केल्याची घटना घडली. मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे पुणे स्थानकावरून यार्डच्या दिशेने जात असताना दोघेही रेल्वे रुळावर झोपले. या दोघांची ओळख पटली नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर काल रात्री एक्स्प्रेस गाडी आली. त्यानंतर सर्व प्रवाशी या गाडीतून खाली उतरले. दरम्यान, सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही गाडी यार्डच्या दिशेने जात असताना एक पुरुष आणि एक महिला रेल्वे रुळावर जाऊन झोपले. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले या दोन मृत व्यक्तींच्या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. दोघेही ४० वयोगटातील आहे. रेल्वे पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासात असून पुढील तपास सुरू आहे.
बेरोजगारीला कंटाळून माजी आमदार आणि शिंदेंच्या शिवसेनेतील नेते राम पंडागळे यांच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मुंबईतील कंदिवली पूर्व येथील लोखंडवाला परिसरातील एका आलिशान अपार्टमेंटमधील राहत्या घरी त्याने छताला गळफास लावून आत्महत्या केली. जयेश पंडागळे (वय, ३९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी (१३ ऑक्टोबर २०२४) जयेश दुपारी झोपायला गेला. मात्र, तो अनेक तास बाहेर न आल्याने त्याच्या आईने त्याला हाक मारली, पण त्याच्या खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर संध्याकाळी घरच्यांनी त्याच्या खोलीचा दरवाजा तोडला असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला त्वरीत जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
संबंधित बातम्या