मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Malshej Ghat Landslide : माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळली; चुलता- पुतण्याचा जागीच मृत्यू

Malshej Ghat Landslide : माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळली; चुलता- पुतण्याचा जागीच मृत्यू

Jun 12, 2024 01:41 PM IST

Landslide On Autorickshaw In Malshej Ghat: माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळल्याने चुलता- पुतण्याचा जागीच मृत्यू झाला.

माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला.
माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला.

Malshej Ghat Landslide News: कल्याण- नगर महामार्गावरील माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, तीन जण जखमी झाले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत चुलता- पुतण्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राहुल भालेराव (वय, ३०) आणि त्याचा पुतण्या स्वयं (वय, ७) अशी मृतांची नावे आहेत. भालेराव कुटुंब मुंबईच्या मुलुंड येथील रहिवाशी असून ते रिक्षाने अहमदनगर जिल्ह्यातील चंदनापूर येथे मूळ गावी जात होते. मात्र, घाटावरून जात असताना त्यांच्या रिक्षावर दरड कोसळली. राहुल आणि स्वयंसह घरातील एकूण पाच जण ढिगाऱ्याखाली अडकली. मात्र, तिघांनी प्रसंगावधान दाखवत स्वत:चे प्राण वाचवले. पण राहुल आणि स्वयं यांना ढिगाऱ्यातून बाहेर निघता आले नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

महाराष्ट्रात नुकतेच मोसमी पावसाचे आगमन झाले. मागील काही दिवसांपासून माळशेज घाटासह आजुबाजूच्या परिसरात पाऊस सुरू आहे. मात्र, या पावसामुळे घाटातील कपाऱ्यांमध्ये पाणी जाऊन डोंगरावरील कोसळून अपघात घडत असतात. कल्याणवरुन अहमदनगरच्या दिशेने जाण्यासाठी माळशेज घाटातून जाणारा हा एकमेव मार्ग आहे. पावसाळ्यामध्ये या घाटातून प्रवाशांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो.

ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू

ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर टागोर नगरजवळ इतर वाहनांना ओव्हरटेक करताना झालेल्या धडकेत ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. गोदरेज कंपनी महामार्गापासून ठाण्याच्या दिशेने ५०० मीटर पुढे ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकमध्ये लोखंडी रॉड भरलेले होते. या धडकेत चालकाच्या अंगात रॉड घुसला. हा अपघात आज पहाटे ४:३० वाजता झाला. तर, सकाळी ७.३० वाजेपर्यंत मृत चालकाच्या शरीरातून लोखंडी रॉड काढण्यात आले नव्हते. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

WhatsApp channel
विभाग