Malshej ghat : माळशेज घाट फिरण्यासाठी गेलेल्या मित्रांच्या गाडीचा भीषण अपघात; फ्रेंडशिप डेच्या दिवशीच काळाचा घाला-malshej ghat ertiga car accident 3 died 3 injured near bhorande village pune ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Malshej ghat : माळशेज घाट फिरण्यासाठी गेलेल्या मित्रांच्या गाडीचा भीषण अपघात; फ्रेंडशिप डेच्या दिवशीच काळाचा घाला

Malshej ghat : माळशेज घाट फिरण्यासाठी गेलेल्या मित्रांच्या गाडीचा भीषण अपघात; फ्रेंडशिप डेच्या दिवशीच काळाचा घाला

Aug 05, 2024 02:22 PM IST

Malshej ghat accident : माळशेज घाट फिरण्यासाठी गेलेल्या मित्रांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

माळशेज घाट फिरण्यासाठी गेलेल्या मित्रांच्या गाडीचा भीषण अपघात; फ्रेंडशिप डेच्या दिवशीच काळाचा घाला
माळशेज घाट फिरण्यासाठी गेलेल्या मित्रांच्या गाडीचा भीषण अपघात; फ्रेंडशिप डेच्या दिवशीच काळाचा घाला

Malshej ghat accident : पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पुण्यातील पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे प्रमाण वाढले आहे. माळशेज घाटाला पर्यटकांची पहिली पसंती असून रविवारी सुट्टी निमित्त व फ्रेंडशीप डे निमित्त फिरायला गेलेल्या मित्रांवर काळाने घाला घातला आहे. पाच मित्र रविवारी कारने माळशेज घाटात फिरण्यासाठी गेले असता, परत येत असतांना गडीवरील नियंत्रण सुटून ती झाडावर आदळल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. तर इतर तिघे जखमी झाले आहेत. माळशेज घाटातल्या भोरांडे गावाजवळ ही घटना घडली.

नरेश म्हात्रे (वय ३१, रा. चिंचपाडा), अश्विन भोईर (वय ३०, रा. वरप), प्रतीक चोरगे (वय २१, रा. गोवेली) अशी या आपघतात मृत्यूमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. तर अक्षय मोंडुले ( रेवती पाडा), शिवाजी घाडगे (रेवती पाडा), वैभव कुमावत अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

राज्यामध्ये सध्या आपघातांचे प्रमाण वाढले आहे. रविवारी सकाळी नगर कल्याण मार्गावर झालेल्या अपघात चार महिलांचा मृत्यू झाला होता. यानंतर रात्री देखील अपघात झाल्याने यात तिघा मित्रांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री माळशेज घाटात मुरबाड तालुक्यातील कल्याण मुरबाड माळशेज महामार्गावरर कासार पुला जवळ वळणाचा अंदाज न आल्याने कार झाडावर आदळली. या अपघात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर इतर चौघे जखमी झाले आहेत.

या अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत दुर्घटनेतील मृत व जखमी सर्व कल्याण व रेवती येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. रात्रीच्या वेळी माळशेज घाटातील रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची भरधाव वेगातील कार ही एका झाडावर जाऊन आदळली. यामुळे हा अपघात झाला.

हे सर्व मित्र, माळशेज घाटात फिरायला गेले होते. यानंतर ते भीमाशंकरला देवदर्शनासाठी जात होते. मात्र, वाटेतच त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला.

नगर कल्याण मार्गवर भीषण अपघात

नगर- कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा येथे भरधाव बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर आली. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आळेफाट्यावरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या बसने समोरून येणाऱ्या कारला धडक दिली. ही धडक इतकी होती की, दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

विभाग