Mumbai Water Supply News: मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लोअर परळ परिसरातील तानसा मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे लोअर परळ, दादर, प्रभादेवी आणि आसपासच्या विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा दोन बंद राहणार आहे. या काळात नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले.
लोअर परळ येथील १,४५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम २८ नोव्हेंबर २०२४ रोजी १० वाजता हाती घेण्यात येणार आहे. हे काम दुसऱ्या दिवशी २९ नोव्हेंबर २०१४ रोजी रात्री ८ वाजेपर्यंत पूर्ण केले जाईल. मात्र, या २२ तासांच्या कालावधील अनेक भागातील पाणीपुरवठा बंद असणार आहे. 'या कालावधीत नागरिकांच्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच पाण्याचा वापर काटकसरीने करावा', असे अवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
जी दक्षिण विभाग: करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ, लोअर परळ परिसर, ना. म. जोशी मार्ग, ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ, संपूर्ण प्रभादेवी परिसर, पी. बाळू मार्ग, हातिसकर मार्ग, आदर्श नगर, जनता वसाहत, अप्पासाहेब मराठे मार्ग, वीर सावरकर मार्ग, ना. म. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, गणपतराव कदम मार्ग, प्रभादेवी आणि संपूर्ण लोअर परळ स्थानक परिसर.
जी उत्तर विभाग: सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, एल. जे. मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, अरूणकुमार वैद्य मार्ग.