Traffic Route Changes in Mumbai : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. उद्या रात्रीच्या सुमारास हा जल्लोष साजरा करण्यासाठी नागरीक बाहेर पडणार असल्याने संभाव्य गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईत वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी गिरगाव, जुहू चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया या परिसरामध्ये वाहतुकीत आणि वाहन तळाच्या ठिकाणांमद्धे मोठे बदल केले आहेत.
उद्या दुपारी २ पासून ते १ जानेवारी सकाळी ८ पर्यंत गिरगाव चौपाटी परिसरातील जुहू तारा रोड आणि वैकुंठलाल मार्ग हा नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक (रिगल जंक्शन) ते गेट वे महाराज मार्ग ऑफ इंडिया मार्गे दि बॉम्बे प्रेसिडेन्सी क्लब (रेडिओ क्लब) कडे जाण्याकरता दक्षिण वाहिनी आणि त्याच मार्गानं परत येण्याकरता (उत्तर वाहिनी) अशा दोन्ही वाहिनी आपत्कालीन सेवेतील वाहनं वगळून इतर सर्व वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे.
नागरिकांना पर्यायी मार्ग असलेल्या अॅडम स्ट्रिट पर्यायी मार्ग पी. रामचंदानी मार्ग पर्यायी मार्ग के.एस. धारीया चौक (बेस्ट जंक्शन) पर्यायी मार्ग लोकांना सोडण्यासाठी आणि घेण्यासाठीचे ठिकाण शहीद भगतसिंह मार्गे डावे वळण महाकवी भूषण मार्ग उजवे वळण घेऊन बोमन बेहराम मार्गे पुढे इच्छित स्थळी जावे लागणार आहे.
महाकवी भूषण मार्ग आणि बोमन बेहराम मार्ग जंक्शन येथून अॅडम स्ट्रिट मार्गे छत्रपती शिवाजी महाराज मार्ग रिगल जंक्शनकरता जाणाऱ्या वाहनांना आपत्कालीन सेवेतील वाहने आणि बेस्ट बसेस वगळून इतर सर्व वाहतूक बंद राहणार आहे. या मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून के . एस . धारिया महाकवी भूषण मार्गे उजवे वळण घेऊन बोमन बेहराम मार्गे उजवे वळण-चौक (बेस्ट जंक्शन) उजवं वळण घेत शहीद भगतसिंह मार्गे पुढे इच्छित स्थळी जातील.
दि बॉम्बे रेसीडेन्सी क्लब ( रेडीओ क्लब ) येथून अॅडम स्ट्रिट कडे येणाऱ्या वाहनांना आपत्कालीन सेवेतील वाहने वगळून इतर सर्व वाहतुकीस बंद राहणार आहे. नागरिकांना पर्यायी मार्ग म्हणून दि बॉम्बे रेसीडेन्सी क्लब (रेडीओ क्लब) येथून हाजी नियाझ आझमी मार्ग जगन्नाथ जे . पालव चौक (भिडभंजन मंदिर) उजवे वळण घेत शहीद भगतसिंह मार्गे पुढे जाता येणार आहे. श्रीमती वाअल्या चौकाकडुन पी . रामचंदानी कडे जाणारा मार्ग आपत्कालीन सेवेतील वाहने वगळून इतर सर्व वाहतूकीस बंद ठेवला जाणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्ग म्हणून के. एस. धारिया चौक ( बेस्ट जंक्शन ) श्रीमती वायलट अल्वा चौक उजवे वळण घेत बोमन बेहराम मार्ग हाजी नियाझ आझमी मार्ग डावे वळण घेऊन दि बॉम्बे प्रेसीडेन्सी क्लब (रेडीओ क्लब) रोडने पुढे जावे.
शहीद भगतसिंह मर्गावर विस्तारीत आमदार निवासासमोर २ एमजी मार्गावर जहांगीर आर्ट गॅलरीसमोर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे. महाकवी भूषण मार्ग, बेस्ट मार्ग, हेन्री रोड, बी . के . बोमन बेहराम मार्ग, हाजी नियाज आझमी मार्ग या पर्यायी मार्गावर उद्या रविवारी ६ पासून सोमवारी १ तारखेच्या पहाटे ६ पर्यंत नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे. हुतात्मा राजगुरु चौक ( मंत्रालय जंक्शन ) ते वेणुताई चव्हाण चौक ( एअर इंडीया जंक्शन ) पर्यत उत्तर वाहीनी सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद ठेवला जाणार आहे.
महर्षी कर्वे रोड मार्गे रामनाथ पोददार चौक (गोदरेज जंक्शन) अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट जंक्शन) - मरीन लाईन्स चर्नी रोड- पंडीत पलुस्कर चौक (ऑपेरा हाऊस जंक्शन) मार्गाने पुढे इच्छित स्थळी जाता येणार आहे. तर बॅरीस्टर रजनी पटेल मार्ग हा साखर भवन जंक्शन येथुन एन . एस रोडला येणारी उत्तर वाहीनी सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद ठेवण्यात येणार आहे.