मुंबईच्या सांताक्रुझ पश्चिमेकडील एका इमारतीच्या तळघराला आग लागल्याची घटना घडली आहे. सांताक्रुझ पश्चिमेतील एसव्ही रोडवरील मिलन सब वे जवळील धीरज हेरिटेज इमारतीला लागलेल्या आगीत दोन महिला अडकल्या होत्या. त्यातील एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रुझ पश्चिमेकडील एस. व्ही. रोडवरील धीरज हेरिटेज या इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. या इमारतीच्या तळघराला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. तळघारात लागलेली आग इमारतीच्या सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली. आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. यामध्ये दोन महिला अडकल्या होत्या. आग लागल्यानंतर स्थानिकांनी तातडीने अग्निशमन दलाला याची सूचना दिली.
आगीची माहिती मिळताचअग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. चार फायर इंजिन आणि एक रुग्णवाहिका, इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारी आणि महापालिका कर्मचारी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे.