Thane News: ठाण्यातील अंबरनाथ येथील सर्कस ग्राउंड परिसरातील झोपडपट्टीला आज (सोमवार, २६ फेब्रुवारी) भीषण आग लागली. घरगुती सिलिंडरचा स्फोन झाल्याने ही आगल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. झोपडपट्टीतील एका घरात सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही परिसरात पसरली. या आगीत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी न झाल्याची वृत्त आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
या आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी स्थानिक लोकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. तर, काही जण आग विझवण्याच्या प्रयत्नात गुंतलेले दिसत आहेत.
महाराष्ट्रातील ठाणे शहरात रविवारी सकाळी एसटी महामंडळाच्या बसला आग लागली. या बसमध्ये एकूण ४५ प्रवासी होते. या प्रवाशांची सुखरूख सुटका करण्यात आली. ही घटना कळवा पोलीस ठाण्याजवळील विटावा पुलाजवळ सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास घडली, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी दिली. ही बस खोपट डेपोतून रायगड जिल्ह्यातील पालीकडे जात असताना तिच्या इंजिनला अचानक आग लागली, अशी महिती समोर आली.