Bhiwandi Fire : भिवंडीत कॉम्प्लेक्समध्ये अग्नितांडव; संपूर्ण गोदाम जळून खाक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhiwandi Fire : भिवंडीत कॉम्प्लेक्समध्ये अग्नितांडव; संपूर्ण गोदाम जळून खाक

Bhiwandi Fire : भिवंडीत कॉम्प्लेक्समध्ये अग्नितांडव; संपूर्ण गोदाम जळून खाक

Dec 06, 2024 04:06 PM IST

Bhiwandi Fire : आगीमुळे गोदामात ठेवण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक साहित्याला आग लागली. या गोदामाला नेमकी आग कशी लागली,याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

भिवंडीत कॉम्प्लेक्समध्ये अग्नितांडव
भिवंडीत कॉम्प्लेक्समध्ये अग्नितांडव

भिवंडी तालुक्यातील राहणाळ येथे पेरणा कॉम्प्लेक्स येथील गोदामाला भीषण आग लागली. गोदामात इलेक्ट्रॉनिक सामान असल्याने आगीचा भडका उडाला. घटनास्थळी अग्निशामक दलाची एक गाडी व पाण्याचा एक टँकरही दाखल झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू असून या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले.

भिवंडी तालुक्यातील राहणाळमधील एका कॉम्पलेक्समधील गोदामाला आग लागली. या भीषण आगीत गोदामातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेने परिसरातील लोकांची एकच धावाधाव झाली. आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. 

या आगीमुळे गोदामात ठेवण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक साहित्याला आग लागली. या गोदामाला नेमकी आग कशी लागली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

घटनास्थळी अग्निशामक दलाची एक गाडी आणि एक पाण्याचा टँकर पोहोचला आहे. अग्निशामक दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.

गोदामात मोठ्या प्रमाणात हायड्रोलिक ऑयल, प्लास्टिकचे सामान आणि केमिकल ठेवण्यात आले होते. गोदामातून आगीचे लोट येत असून संपूर्ण गोदाम आगीत भस्मसात झाले आहे. परिसरात धुराचे साम्राज्य दिसत असून आकाशात दूरवरून धूर व आगीचे लोट दिसत आहे. आगीचे कारण अजून अस्पष्ट असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर