Pune News year traffic change near dagadusheth temple : नवीन वर्षाची सुरुवात पुणेकर हे देवदर्शाने करणार असल्याने दगडूशेठ मंदिरात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी राज्यसह देश भरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. एक तारखेला देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर उद्या सोमवारी (दि १) मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर दगडू शेठ गणपती मंदिर आणि दत्त महाराज मंदिर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असल्याने या रस्तावर नेममी वर्दळ असते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात नागरीक येणार असल्याने येथे वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. येथील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना खंडोजीबाबा चौकमार्गे टिळक रस्त्याने स्वारगेटकडे जावे. जंगली महाराज रस्त्यावरील स. गो. बर्वे चौकातून (माॅडर्न कॅफे चौक) महापालिका भवनकडे जाणारा मार्ग वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौक, महापालिका भवनमार्गे इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे (हुतात्मा चौक) जाणारा मार्ग बंद करण्यात येणार आहे. यामुळे वाहनचालकांनी बाजीराव रस्त्याने इच्छितस्थळी जावे. शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौकातून गणेश रस्त्यावरुन दारुवाला पूलकडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी गाडगीळ पुतळामार्गे, कुंभारवेस चौक, पवळे चौक, साततोटी चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. गणेश रस्त्याने जिजामाता चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.