Pune Traffic Update : राज्यात आज विधानसभा निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. पुण्यात देखील ८ मतदारसंघाची मतमोजणी मतमोजणी भारतीय खाद्य निगम (एफ.सी.आय. गोडाऊन) कोरेगाव पार्क येथील गोदामात होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी शासकीय यंत्रणेची या ठिकाणी वर्दळ राहणार असल्याने व शासकीय अधिकारी, कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी व अन्य नागरिक यांची वाहने त्याठिकाणी येणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच वाहतूक सुरळित व सुरक्षित राहण्याच्यादृष्टिने येथील वाहतुकीत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. येथील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
भारतीय खाद्य निगम (एफ.सी.आय. गोडावुन) कोरेगाव पार्क येथील मतमोजणी केंद्रासमोरील साऊथ मेन रोड वर पूर्वेस लेन नंबर ५ जक्शंन, पश्चिमेस लेन नंबर २ जक्शंनपर्यंत तसेच लेन नंबर ३ व लेन नंबर ४ वर २०० मीटरपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना नो पार्किंग झोन करण्यात येत आहे.
डॉन बॉस्को युवा केद्रापासून पुढे साऊथ मेन रोडवरील वाहतूक २२ नोव्हेंबर रोजी रात्री २२.०० वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे. सेंट मीरा कॉलेज व अतुरपार्क सोसायटी कडून साऊथ मेन रस्त्याकडे येणाऱ्या वाहनांना लेन नंबर १ पुढे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
लेन नंबर ५, ६ व ७ कडून साऊथ मेन रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना लेन नंबर ४ पुढे प्रवेश बंद राहील. या मार्गानी येणाऱ्या वाहनचालकांना उजवीकडे वळण घेऊन इच्छित स्थळी जाता येईल. लेन नंबर २ वर प्लॉट नंबर ३८ जैन प्रॉपर्टी येथे व लेन नंबर ३ वर बंगला नंबर ६७ व ६८ येथे साऊथ मेन रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पुज्य कस्तुरबा गांधी शाळा नॉर्थ मेन रस्ता कोरेगाव पार्क येथे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या ६०० ते ७०० दुचाकीच्या पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात आली आहे, रोही व्हिला लॉन्स लेन नंबर ७ कोरेगाव पार्क येथे नागरिकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था तर द पुना स्कूल ॲन्ड होम फॉर द ब्लाईड ट्रस्ट, नॉर्थ मेन रस्ता, कोरेगाव पार्क येथे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवेतील पोलीसांची, अग्निशामक, ॲम्ब्युलन्स तसेच निवडणूक अधिकारी यांच्या वाहनांना वगळून आवश्यकतेनुसार वरीलप्रमाणे प्रवेश बंदी तसेच नो- पार्किंग करण्यात येत असून नागरिकांनी वाहतुकीत केलेल्या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेचे उप आयुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी राजगुरूनगरच्या तिन्हेवाडी रोड येथील क्रीडा संकुलात २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी परिसरात विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित राहणार असल्याने २३ नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे ५ वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या परिसरात वाहतुकीत बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास देशमुख यांनी जारी केले आहेत.
या आदेशान्वये शासकीय विश्रामगृह ते तिन्हेवाडी रस्ता ते सांडभोरवाडी रस्त्यावरील व वाळुंजस्थळ ते तिन्हेवाडी ते सांडभोरवाडी रस्त्यावरील सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. सांडभोरवाडी व तिन्हेवाडीकडे पुणे नाशिक महामार्गावरून सांडभोरवाडी फाटा या पर्यायी मार्गाने सर्व वाहनांना सोडण्यात येईल.
मार्केट यार्ड, मार्केटयार्ड रस्ता परिसर व शासकीय केनॉल विश्रामगृह येथील पार्किंग भाजप महायुती उमेदवार यांचे कार्यकर्ते यांना थांबविण्यासाठी व पार्किंग म्हणून राखीव ठेवणेत येत आहे. तर महात्मा गांधी विद्यालय परिसर, पीएमटी बस स्थानक समोरील मोकळी जागा येथे महाविकास आघाडी उमेदवार यांचे कार्यकर्ते यांना थांबविण्यासाठी व पार्किंग म्हणून राखीव ठेवण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेतील पोलीसांची, अग्निशामक, ॲम्ब्युलन्स तसेच निवडणूक प्रक्रियेत समाविष्ठ असलेल्या सर्व प्रकारच्या वाहनांना वगळून आवश्यकतेनुसार २३ नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे ५ वाजेपासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अथवा मतमोजणी पूर्ण होईपर्यंत प्रवेश बंदी करण्यात येत आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.